“जय मल्हार’च्या चेअरमनपदी बाळासाहेब वारघडे
Updated On:

वाघोली – बकोरी (तालुका हवेली) येथील जय मल्हार विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन बाळासाहेब वारघडे यांची तर व्हाईस चेअरमन पदी संतोष वारघडे यांची निवड झाली आहे. निवडीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
भाजप नेते गणेश कुटे यांच्या शुभहस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वाल्मीक वारघडे, सागर वारघडे, संजय वारघडे, गोरख वारघडे, प्रदीप बहिरट, विशाल कुटे, अविनाश कुटे, अजित कुटे, शिवम कुटे, अविनाश कंद, रवींद्र कुटे, तुषार कुटे, आदी उपस्थित होते.
भाजप नेते गणेश कुटे यांनी यावेळी सांगितले की, जय मल्हार सोसायटीच्या निवडणुकीत चेअरमनपदी बाळासाहेब वारघडे यांच्या निवडीने हवेली तालुक्यात प्रथमच सोसायटीच्या निवडणुकीत भाजपने आपले कमळ फुलवले आहे.





