पुणे जिल्हा | बाळासाहेब वसंतराव मांजरे यांची बिनविरोध निवड

राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – मांजरेवाडी पिंपळ येथील शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणार्या विठ्ठल-रुक्मिणी शिक्षण प्रसारक मंडळ व वसंतराव मारुतराव मांजरे विद्यालय या संस्थेच्या अध्यक्षपदी बाळासाहेब वसंतराव मांजरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष स्व. किरण मांजरे यांच्या निधनानंतर संस्थेच्या अध्यक्षपदी बाळासाहेब मांजरे यांची निवड करण्यात आली. तसेच नवनिर्वाचित संचालक म्हणून सचिन किरणशेठ मांजरे व अक्षय ऊर्फ बंटी आंनदा मांजरे यांची निवड करण्यात आली.
यावेळी संस्थेचे सचिव मुरलीधर मांजरे, ज्येष्ठ संचालक काळूराम मांजरे, मनोज मांजरे, साळूबाई मांजरे, पार्वतीबाई मांजरे, तुषार मांजरे, विलास मांजरे, महेंद्र मांजरे उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष स्व. किरणशेठ यांचा शैक्षणिक विचार केंद्रबिंदू मानून आगामी काळात सर्व संचालकांना विश्वासात घेऊन शिक्षण क्षेत्रात काम करणार असल्याचे बाळासाहेब मांजरे यांनी यावेळी सागितले.
दरम्यान, किरणशेठ मांजरे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबीयांनी विद्यालयाला 51 हजारांचा धनादेश दिला.विद्यार्थ्यांना वृक्ष वाटप करण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच अशोक मांजरे, कैलास मांजरे विद्यालयाचे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.





