Maharashtra Politics : तांबे प्रकरणावर थोरातांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “इतक्‍या थराला राजकारण गेले की मला …”

Updated On:

संगमनेर (प्रतिनिधी) – मध्यतंरी राजकारण झालं, ते मला व्यथित करणारे आहे. ही वस्तुस्थिती आहे. याबाबत माझ्या भावना मी पक्षश्रेष्ठींना कळवल्या आहेत. हे पक्षीय राजकारण आहे. याबद्दल बाहेर बोललं पाहिजे असे नाही. या मताचा मी आहे. म्हणून याबाबत मी पक्षश्रेष्ठींना कळवले आहे. याबाबत पक्ष आणि मी मिळून योग्य त्या प्रकारे निर्णय घेऊ. बाकी लोकांनी याबाबत विचार करण्याची गरज नाही. इतक्‍या थराला राजकारण गेले की मला थेट भाजपपर्यंत पोहोचविले, पण हा संघर्षाचा काळ आहे, आणि तो संघर्ष करून आम्ही उभे राहू असे आमदार बाळसाहेब थोरात म्हणाले.

नाशिक पदवीधर मतदारसंघातून तांबे मोठ्या मताधिक्‍क्‍याने निवडून आले आहेत. नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत ऐनवेळी कॉंग्रेसचा एबी फॉर्म न जोडता अपक्ष फॉर्म भरल्यामुळे सत्यजित तांबे यांच्यावरून वाद निर्माण झाला. त्यांच्या या भूमिकेनंतर त्यांना कॉंग्रेस पक्षाने निलंबित केले. या सर्व घडामोडी घडत असताना सत्यजित तांबे यांचे मामा म्हणजेच कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर शस्त्रक्रिया केल्याने ते या सर्व घडामोडींपासून लांब होते. ते याबाबत काहीच बोलले नाही. पण आज त्यांनी मौन सोडले.

थोरात बोलताना म्हणाले की, मधल्या काळात खूप राजकारण झालं. मधल्या काळात सत्तांतर झालं. त्यावेळीपासून तालुक्‍यावर सूड उगवला जात आहे. कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे. चांगले चालू असणारे उद्योग व्यवसाय बंद पाडले जात आहेत. आपण संघर्षातून मोठे झालो आहोत. या संघर्षातून आपण बाहेर येऊ आणि आणखी नव्या उमेदीने उभं राहू. त्याचबरोबर आता विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठं राजकारण झालं तरीदेखील सत्यजित मोठ्या मताने विजयी झाला असं तर म्हणाले आहेत.

विधान परिषदेच राजकारण सुरू असताना अनेक बातम्या आल्या. भाजपपर्यंत आपल्याला पोहचविले. इतकच नाही तर भाजपच्या तिकिटाचे वाटपही त्यांनी केले आहे. काही लोक कशा पद्धतीने गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करतात. काही लोक ही काम मुद्दाम करतात. अशा पद्धतीच्या चर्चा ते घडवून आणतात. तरी देखील कॉंग्रेसचा विचार हा आपला विचार आहे आणि त्याच विचारान आम्ही पुढे देखील चालू. आतापर्यंत याच विचाराने जात आहोत. पुढे देखील याच विचाराने चालू असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी ते भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/center-gives-in-principle-approval-for-pune-nashik-high-speed-railway-deputy-chief-minister-devendra-fadnavis/

मी कॉंग्रेसच्या विचाराने आतापर्यंत चाललो पुढेही याच कॉंग्रेसच्या विचाराने चालेल आणि याची ग्वाही मी देतो पुढच्या काळात यांच्यासोबत असेच उभे रहा असंही बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Newasa News : विखे विरुद्ध थोरात संघर्ष थांबणार? अहिल्यानगर जिल्हा बँकेत 'हे' नेते ठरणार किंगमेकर

2026-10-05 17:12:54

Newasa News : विखे विरुद्ध थोरात संघर्ष थांबणार? अहिल्यानगर जिल्हा बँकेत 'हे' नेते ठरणार किंगमेकर

Maharashtra Politics : शिंदेंना मोठा धक्का ! 'या' आमदाराची आमदारकी रद्द होणार? कोर्टाच्या निर्णयाने उडाली खळबळ

2026-07-30 16:19:08

Maharashtra Politics : शिंदेंना मोठा धक्का ! 'या' आमदाराची आमदारकी रद्द होणार? कोर्टाच्या निर्णयाने उडाली खळबळ

Satyajeet Tambe : बेरोजगारीचा फायदा घेऊन तरुणांची फसवणूक; सत्यजीत तांबे यांची विधानसभेत माहिती

2026-06-29 19:07:18

Satyajeet Tambe : बेरोजगारीचा फायदा घेऊन तरुणांची फसवणूक; सत्यजीत तांबे यांची विधानसभेत माहिती

Satyajeet Tambe : "शालेय शिक्षण विभाग सर्वाधिक बदनाम"; सत्यजित तांबे यांचा  हल्लाबोल

2026-06-26 15:45:29

Satyajeet Tambe : "शालेय शिक्षण विभाग सर्वाधिक बदनाम"; सत्यजित तांबे यांचा  हल्लाबोल

Maharashtra Politics : मोठा ट्विस्ट..! विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवार देणार; 'या' नावाची जोरदार चर्चा

2026-04-21 21:17:37

Maharashtra Politics : मोठा ट्विस्ट..! विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवार देणार; 'या' नावाची जोरदार चर्चा