Balasaheb thorat on Ashok Chavhan – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देणाऱ्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर सडकून टीका केली आहे. अशोक चव्हाण दबावामुळे किंवा स्वार्थापोटी भाजपत गेलेत. पक्षाने त्यांना खूपकाही दिले. पण आता काँग्रेसच्या तत्वज्ञानात असा कोणता दोष निर्माण झाला की त्यामुळे थेट काँग्रेसच सोडण्याचा निर्णय घेतला, असे ते म्हणाले आहेत. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेलेत. त्यांचा तिकडे जाण्याची टायमिंग पाहिली तर दिल्लीत शेतकऱ्यांवर लाठीमार व अश्रूधूर सुरू असताना ते भाजपत गेले आहेत. काँग्रेसने अशोक चव्हाण यांच्या वडिलांना खूप काही दिले. त्यांना अनेक संधी दिल्या. त्यानंतर त्यांचे सुपुत्र म्हणून पक्षाने अशोक चव्हाण यांनाही खूपकाही दिले. आता काँग्रेसच्या तत्वज्ञानात असा कोणता दोष निर्माण झाला की त्यामुळे त्यांना थेट काँग्रेसच सोडावी लागली? असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी चव्हाण यांच्यावर निशाणा साधताना उपस्थित केला. | Balasaheb thorat on Ashok Chavhan अशोक चव्हाण यांच्यावर काहीतरी दबाव होता का? ते एखाद्या दबावाने किंवा स्वार्थापोटी भाजपमध्ये गेलेत, असेही थोरात यावेळी म्हणाले. | Balasaheb thorat on Ashok Chavhan