शास्तीकराबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू – बाळासाहेब थोरात

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांवर लावलेला शास्तीकर सरसकट माफ करावा, ही नागरिकांची रास्त मागणी आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे.
शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मंगळवारी (दि. 11) मुंबईत महसूल मंत्री थोरात यांची भेट घेतली. शहरातील नागरिकांवर अनधिकृत बांधकामांसाठी लादण्यात आलेला शास्तीकर सरसकट रद्द करावा, अशा मागणीचे पत्र साठे यांनी थोरात यांना दिले.
माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे यांच्यासह गौतम आरकडे, महिला प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, प्रदेश कार्यकारिणी सदस्या निगार बारस्कर, ज्येष्ठ नेते सुदाम ढोरे, विष्णुपंत नेवाळे, शाम आगरवाल, प्रदेश युवक सरचिटणीस मयूर जयस्वाल, मकर यादव, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, लक्ष्मण रुपनर, बाळासाहेब साळुंके, ऍड. क्षितीज गायकवाड, सज्जी वर्की, सुनिल राऊत, किशोर कळसरकर, बाबा बनसोडे, हिरामण खवळे, विशाल कसबे, वकिलप्रसाद गुप्ता आदी उपस्थित होते.





