वाघोली : बकोरी तालुका हवेली या ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य संतोष रानबा वारघडे यांच्या सन 2001 नंतर जन्मलेल्या आपत्यांची संख्या तीन असल्यामुळे त्यांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिला आहे. याबाबत रामराव तुळशीराम कुटे राहणार बकोरी यांनी 7 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज केला होता. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत सदस्य संतोष वारघडे यांना सन 2001 नंतर जन्मलेल्या अपत्यांची संख्या तीन असल्यामुळे त्यांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात यावे याकरिता महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार अर्ज दाखल केला होता. प्रस्तुत प्रकरणी सर्व नोटीसा काढून सुनावणी निश्चित करून तक्रारदार व गैर अर्जदार यांना देखील प्रस्तुत प्रकरणी म्हणणे मांडण्यासाठी संधी दिली होती. संतोष रानबा वारघडे यांना ग्रामपंचायत बकोरी सदस्य पदी राहण्यास अपात्र ठरवण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी पुणे यांनी दिला असून योग्य त्या कार्यवाहीसाठी पुढील प्रत अप्पर तहसीलदार लोणी काळभोर, गटविकास अधिकारी हवेली, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे व ग्रामपंचायत ग्रामसेवक बकोरी यांना दिली आहे.