बजाज ऑटोचे बाजार मूल्य एक लाख कोटीवर; जगातील पहिलीच दूचाकी कंपनी
Updated On:

मुंबई – बजाज ऑटोचे शेअर बाजारातील मुल्य शुक्रवारी एक लाख कोटी रुपयांवर गेले.
जगात एवढे बाजार मूल्य असलेली बजाज ऑटो ही पहिलीच दुचाकी कंपनी आहे. सध्या राष्ट्रीय शेअर बाजारावर बजाज ऑटोच्या शेअरचा भाव 3,479 रुपये आहे.
बजाज ऑटो दुचाकी क्षेत्रात 75 वर्षापासून कार्यरत आहे. कंपनीने गेल्या काही वर्षात मोटर सायकल निर्मितीवर भर दिला असून कंपनी देशांतर्गत बाजाराबरोबरच निर्यातही मोठ्या प्रमाणात करते.
आता आम्ही जागतिक पातळीवरील आमच्या ग्राहकांना अधिक चांगले उत्पादने देण्याचा प्रयत्न करू असे बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी सांगितले. सध्या कंपनीचे चाकण, वाळूज आणि पंतनगर येथे प्रकल्प आहे.





