बजाजची खास ऑफर! पल्सरवर मोठी सूट, होईल 7300 रुपयांपर्यंतची बचत; पाहा डिटेल्स

Bajaj Pulsar Offer | बजाज ऑटोने नुकताच पल्सर मॉडेलच्या 2 कोटी विक्रीचा टप्पा ओलांडला आहे. 2001 मध्ये पहिले मॉडेल लॉन्च झाल्यापासून कंपनीने पल्सर ब्रँडची विक्री 50 हून अधिक देशांमध्ये वाढवली आहे. या कामगिरीचा आनंद साजरा करण्यासाठी, कंपनीने भारतात ठराविक पल्सर मॉडेल्सच्या खरेदीवर 7,300 रुपयांपर्यंतची बचत जाहीर केली आहे.
बजाजच्या या बाईक्सवर मिळेल बंपर ऑफर
बजाज ऑटोने पल्सर मॉडेलच्या 2 कोटी विक्रीचा टप्पा ओलांडल्याच्या निमित्ताने ठराविक मॉडेल्सवर आकर्षक डिस्काउंट जाहीर केली आहे. पल्सर 125 निऑनवर 1,184 रुपये, पल्सर 125 कार्बन फायबर आणि पल्सर 150 (सिंगल व ट्विन डिस्क) वर प्रत्येकी 2,000 रुपये, पल्सर N160 USD वर 5,811 रुपये आणि पल्सर 220F वर 7,379 रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. पल्सर 220F वरील ही सूट मात्र केवळ महाराष्ट्र, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये उपलब्ध आहे.
पल्सर 150 आणि 180 मॉडेल्सच्या लाँचने भारतीय दुचाकी बाजारात मोठी क्रांती घडवून आणली. दमदार इंजिन, आधुनिक तंत्रज्ञान आणि आकर्षक लूक यामुळे या गाड्या अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या. त्यानंतर बजाजने पल्सरच्या विविध मॉडेल्सच्या निर्मिती आणि विक्रीवर भर दिला.
पल्सर 220F सारखी काही मॉडेल्स आजही लोकप्रिय आहेत, तर काही मॉडेल्स वाढत्या स्पर्धेमुळे मागे पडले. सध्या, बजाजकडे 125cc ते 400cc पर्यंतची 12 पल्सर मॉडेल्स आहेत. कंपनीच्या या बाईक्स खासकरून तरूणवर्गामध्ये विशेष लोकप्रिय आहेत.
दरम्यान, बजाजला पल्सरच्या पहिल्या 1 कोटी युनिट्सची विक्री करण्यासाठी 17 वर्षे लागली, तर पुढील 1 कोटी युनिट्सची विक्री केवळ 6 वर्षांत झाली.

