Satara: बीएआयचे सातारा सेंटरचे काम नेहमीच कौतुकास्पद – रवींद्र त्यागी
Satara रचना 2026 प्रदर्शन हे पोलीस परेड मैदानावर दि. 26 ते 29 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत आयोजित केले असून प्रवेश विनामुल्य आहे. सदर प्रदर्शनास सर्वांनी सहकुटुंब आवर्जून भेट द्यावी असे आवाहन बिल्डर्स असोसिएशनच्या सातारा शाखेतर्फे करण्यात आले आहे.

Satara: स्वतःचे एक घर असावे हे प्रत्येक नागरिकाचे स्वप्न असते. पुढील काळात सर्व सामान्यांना परवडणारी घरे म्हणजेच फोर्डेबल हाऊसेस या संकल्पनेवर काम करावे. बीएआयचे सातारा सेंटरचे काम नेहमीच कौतुकास्पद असते. सातारा सारख्या छोट्या शहारात रचना सारख्या भव्य वास्तू प्रदर्शनाचे आयोजन करून सातारा सेंटरने देशभर नावलौकीक मिळवला आहे. बीएआय सातारा सेंटरची टीम ही देशातील सर्वात तरूण टीम आहे. आजच्या घडीला केवळ शहरांच्या विकासाचा विचार न करता ग्रामीण भागाच्या विकासासाठी सुध्दा बिल्डर्स असोसिएशनच्या सदस्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे नॅशनल प्रेसीडेंट रवींद्र त्यागी यांनी केले.
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखेच्यावतीने आयोजित रचना 2026 या बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी रवींद्र त्यागी बोलत होते. यावेळी नॅशनल व्हाईस प्रेसीडेंट महेश मुद्दा, बीएआयचे महाराष्ट्र स्टेट चेअरमन प्रकाश मेंडा, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजू भोसले यांच्या हस्ते व बिल्डर्स असोसिएशनचे सातारा सेंटर चेअरमन कौस्तुभ मोरे, व्हाईस चेअरमन हर्षद वालावलकर, सेक्रेटरी नीलेश शिंदे, खजिनदार शरद जाधव, कौन्सिल मेंबर संतोषकुमार जगताप, सचिन देशमुख, रामदास जगताप, स्कॉन इन्फ्रा प्रिस्ट्रेस एल.एल.पी. चे अनिकेत कंक , कंग्राळकर असोसिएटस्चे चेअरमन श्रीधर कंग्राळकर, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चीफ मॅनेजर संजू जिलेंदर, उथ्थान एलिवेटरचे वैभव सकुंडे, नवनिर्मितचे विकास जाधव, परफेक्ट हाऊसचे अक्षय साळुंखे व अन्य मान्यवर उपस्थितीत होते. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी रचना प्रदर्शनाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
बिल्डर्स असोसिएशन सातारा शाखेचे अध्यक्ष कौस्तुभ मोरे म्हणाले, सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला भूषणावह ठरेल असे रचना प्रॉपर्टी एक्स्पो 2026 या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. भव्य मंडप, आकर्षक प्रवेशद्वार, लाईट सिस्टिम्स्, आकर्षक स्टॉल्स असे या प्रदर्शनाचे भव्य दिव्य आयोजन आहे. लोकांकडूनही या उपक्रमाला वाढता प्रतिसाद आहे. यावेळी सुमारे चार लाखापेक्षा जास्त नागरिक भेट देतील व सुमारे 50 कोटींपेक्षा जास्त उलाढाल रचना प्रॉपर्टी एक्स्पो 2026 मध्ये होईल अशी अपेक्षा आहे.
यावेळी बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने सर्व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार सन्मानचिन्ह, बुके देऊन असोसिएशनचे अध्यक्ष कौस्तुभ मोरे , सेक्रेटरी नीलेश शिंदे, उपाध्यक्ष हर्षद वालावलकर, खजिनदार शरद जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. सुधाकर भोसले यांनी सूत्रसंचालन केले. सेक्रेटरी नीलेश शिंदे यांनी आभार मानले. यावेळी सर्व प्रमुख मान्यवरांनी यांनी रचना प्रदर्शनातील सर्व स्टॉल्स्ची पहाणी करून माहिती घेतली. उद्घाटन समारंभास बिल्डर्स असोसिएशनच्या मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगली, बारामती, इचलकरंजी, फलटण, पंढरपूर व अन्य शहरातील पदाधिकारी, सातारा सेंटरचे सर्व पदाधिकारी, बिल्डर्स असोसिएशच्या महिला विंग स्फूर्तीच्या सर्व सदस्य व कुटुंबिय उपस्थित होते.
रचना 2026 प्रदर्शन हे पोलीस परेड मैदानावर दि. 26 ते 29 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत आयोजित केले असून प्रवेश विनामुल्य आहे. सदर प्रदर्शनास सर्वांनी सहकुटुंब आवर्जून भेट द्यावी असे आवाहन बिल्डर्स असोसिएशनच्या सातारा शाखेतर्फे करण्यात आले आहे.





