कामगाराला पेटवून दिल्याप्रकरनात ठेकेदार आणि साथीदाराला जामीन 

पुणे: सेंट्रीगच्या केलेल्या कामाचे पैसे मागितल्याने कामगाराला पेटवून देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात ठेकेदारासह दोघांना सत्र न्यायाधीश एस.एच. ग्वालानी यांनी 15 हजार रुपयांचा जामीन मंजुर केला आहे.

ठेकेदार मोहम्मद जुमुरातिमिया अन्वर (वय 40, रा. काळेवाडी, मूळ. बिहार) आणि त्याचा साथीदार संतोषकुमार हरब राम (वय 36, रा. ताथवडे, मूळ. झारखंड) अशी त्या दोघांची नावे आहेत. दोघांनी ऍड. श्रीकृष्ण घुगे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला. सुभाष विश्‍वनाथ साह (वय 33, रा. ताथवडे, मूळ. बिहार) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. साह हे अन्वर याच्याकडे कामाला होते. केलेल्या एक वर्षाच्या कामाचे पैसे मागितल्याने त्यांना पेटवून देण्यात आले. नंतर त्यांनीच रुग्णालयात नेले. घडलेल्या प्रकाराबाबत कोणाला सांगितल्यास इंजेक्‍शन देऊन जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असताना दोघांनी ऍड. श्रीकृष्ण घुगे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. तपासास सहकार्य करण्याच्या अटीवर न्यायालयाने हा आदेश दिला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.