नवी दिल्ली – बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने (बीएआय) गेल्या महिन्यात पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या पॅरा बॅडमिंटन खेळाडूंसाठी ५० लाख रुपयांची बक्षिसे जाहीर केली आहेत. भारताच्या पॅरा बॅडमिंटन खेळाडूंनी १ सुवर्ण, २ रौप्य व २ कांस्य पदकाकांची कमाई केली होती. पुरुष एकेरी (एसएल ३) प्रकारात सुवर्ण मिळविणारा नितीश कुमारला १५ तर पुरुष एकेरीत (एसएल४) रौप्य पदक मिळवणारा सुहास यथीराज व महिला एकेरीत (एसयु५) तुलसीमती मुरुगेसन यांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. महिला एकेरीत (एसयु५) कांस्य पदक मिळविणारी मनीषा रामदास व महिला एकेरीत (एसएच ६) नित्या श्री सिवन यांना प्रत्येकी साडे ७ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. Macau Open 2024 (Badminton) : किदाम्बी श्रीकांतसह आयुष आणि तस्नीमची विजयी सलामी…. बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे सचिव संजय मिश्रा म्हणाले की, भारतीय पॅरा बॅडमिंटन खेळाडूं जागतिक स्तरावर चांगली कामगिरी करत आहेत. हे बक्षीस म्हणजे त्यांच्या प्रयत्नांची संघटनेने घेतलेली दखल असून बीआयए हे पॅरा बॅडमिंटनचा विकास आणि प्रचार करणयासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.