भाजप आमदाराच्या घराबाहेर सापडली पैशानी भरलेली बॅग, सोने-चांदीच्या मूर्तीही आढळल्याने परिसरात खळबळ

मुंबई – भाजप आमदाराच्या घरासमोर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. आमदार प्रसाद लाड यांच्या घरासमोर एक पैशांनी भरलेली बॅग आढळली आहे. ज्यात सोन्या चांदीच्या मूर्ती देखील असल्याचे समोर आले. हा नेमका प्रकार काय आहे हे समजण्यासाठी घटनास्थळी तात्काळ पोलीस दाखल झाले. रविवारी पहाटेच्य सुमारास हा सर्व प्रकार घडला.
आमदार प्रसाद लाड यांच्या माटुंगा येथील घरासमोर हा प्रकार घडला. सकाळी सकाळी सुरक्षा रक्षकाला येथे बॅग दिसली. त्याने आजूबाजूला चौकशी केली तर कोणाचीच नसल्याचे समजले. अखेर हा सर्व प्रकार त्याने प्रसाद लाड यांच्या कानावर घातला. त्यानंतर परिसरात एकच भीतीचे वातवरण पसरले होते. मात्र त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले.
आपल्याला फोनवर अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्याची तक्रार मागील आठवड्यात लाड यांनी पोलिसांत केली होती. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता माझ्या जीवाला धोका आहे, असं देखील लाड म्हणाले होते.त्यानंतर अचानक घरासमोर घडलेल्या या प्रकारामुळे लाड यांच्या घराबाहेर तपासासाठी पोलीस दाखल झाले होते.
विशेष म्हणजे लाड यांच्या घराबाहेर कडेकोट बंदोबस्त असताना देखील असा अनुचित प्रकार घडल्यामुळे सर्वांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात. बॅगेत काही नाणी व सोने चांदीच्या मूर्ती सापडल्या आहेत. बॅग नेमकी तिथे कोणी ठेवली आणि त्या मूर्तींचा काय अर्थ या सर्व प्रश्नांची उत्तरे सध्या पोलीस शोधताहेत.





