मुंबई – प्रसिद्ध रॅपर-गायक बादशाहची गाणी क्लबपासून विवाहसोहळ्यामध्ये रंगत वाढवितांना दिसतात. स्टार्सही बादशाहच्या तालावर नाचताना दिसतात. अशात रॅपर बादशाह लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. बादशाहला त्याच्या आयुष्यातील खरे प्रेम सापडले आहे आणि तो लवकरच लग्न करणार आहे.
बादशाह अनेक दिवसांपासून अभिनेत्री ईशा रिखीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. असे सांगितले जात आहे की हे कपल एकमेकांसाठी खूप सिरिअस आहे आणि लवकरच लग्न करणार आहे. एवढेच नाही तर या महिन्यात लग्न केल्यानंतर दोघे अधिकृतपणे एकमेकांसोबत कायमचे राहणार असल्याचीही बातमी आहे.
बादशाहा-ईशा रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या गेल्या वर्षी इंटरनेटवर गाजल्या होत्या. मात्र, या जोडप्याने या बातम्यांवर आपली प्रतिक्रिया दिली नाही. किंवा नाकारले आहे. या वृत्तांवर दोघांनीही आतापर्यंत मौन बाळगले आहे.
बादशाह नुकताच मुंबईत दिसला आणि असा दावा केला जात आहे की त्याने लग्नाची खरेदी सुरू केली आहे. रिपोर्ट्सनुसार, बादशाहच्या लग्नाबद्दल फक्त त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांनाच माहिती आहे. मात्र, ही बातमी समोर येताच सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. रॅपरचे चाहते त्याला लग्नाच्या पोशाखात पाहण्याची इच्छा व्यक्त करताना दिसत आहेत. बादशाहचे हे दुसरे लग्न आहे. गायकाने पहिले लग्न जस्मिन मसिहशी केले, मात्र, 2020 मध्ये दोघेही वेगळे झाले. आजपर्यंत त्यांच्या विभक्त होण्याचे कारण समोर आलेले नाही.