Badshah Song Controversy: बादशाहच्या गाण्यावरून वाद; FIR दाखल होताच मागितली माफी
Badshah Song Controversy:

Badshah Song Controversy : लोकप्रिय रॅपर आणि गायक बादशहा नव्या हरियाणवी गाण्यावरून अडचणीत सापडला आहे. हरियाणा पोलिसांनी याप्रकरणी रॅपरवर एफआयआर दाखल केला असून, त्याच्याविरुद्ध लुकआउट नोटीसही काढण्यात येणार आहे.
‘टिटिरी’ या गाण्यामुळे हरियाणा सरकारने कठोर भूमिका घेतली असून मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर बादशहाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या गाण्यात हरियाणा रोडवेज बस आणि शाळेचा गणवेश घातलेल्या मुली दाखवल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. यानंतर त्याने व्हिडिओ हटवला असून एक व्हिडिओ पोस्ट करत माफी मागितली आहे. Badshah Song Controversy
बादशहा व्हिडिओमध्ये म्हणाला की, “नमस्कार, मी बादशाह. माझं नवीन गाणं ‘टिटीरी’ प्रदर्शित झाले आहे. मी पाहतोय, या गाण्याच्या शब्दांमुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या गाण्यात गेलेल्या काही दृश्यांमुळे माझ्या हरियाणाच्या लोकांच्या भावनांना ठेच पोहोचली आहे. मी स्वतः हरियाणाचा आहे. माझी ओळख हरियाणामुळेच आहे.
कोणत्याही मुली किंवा मुलाबद्दल अपमानास्पद बोलण्याचा माझा हेतू नव्हता. हिप-हॉप संस्कृतीत स्पर्धात्मक लिरिक्स असतात, पण त्याचा अर्थ कोणाचाही अपमान करणे असा नव्हता.” Badshah Song Controversy
Education Fees : महाविद्यालयांची ‘फी’ वसुली आता रडारवर! सरकारचा कडक इशारा…पाहा काय घडलं?
वाद निर्माण होण्यामागचे नेमकं कारण काय ?
गाण्यात शाळेचा गणवेश घातलेल्या मुली आणि हरियाणा रोडवेजची बस दाखवण्यात आल्यामुळे सरकारने आक्षेप घेतला आहे. यात शालेय गणवेशातील मुली हरियाणा रोडवेजच्या बसमध्ये नाचताना आणि आक्षेपार्ह हावभाव करताना दाखवण्यात आल्या आहेत.
गाण्याचे महिला आणि अल्पवयीन मुलींचा अवमान करणारे आणि अश्लील असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. ‘नारी तू नारायणी उत्थान समिती’ आणि ‘शिव आरती इंडिया फाउंडेशन’ने याविरोधात तक्रार नोंदवली आहे.
View this post on Instagram
हरियाणाचे मुख्यमंत्री नायाब सिंग सायनी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाईचे आदेश दिले आहेत. सरकारच्या प्रतिनिधींनी सांगितले की, गाण्याच्या नावाखाली हरियाणाच्या संस्कृतीची खिल्ली उडवली जात आहे.”सरकारचे म्हणणे आहे की हरियाणातील मुलींच्या सन्मानाला धक्का पोहोचेल असे कोणतेही कृत्य सहन केले जाणार नाही.
Pune Crime : सिंहगड डेंटल कॉलेजच्या विभागप्रमुखाची आत्महत्या! धक्कादाक कारण समोर..वाचा सविस्तर
या गाण्याच्या शूटिंगसाठी रोडवेज बस आणि शाळेचा परिसर कसा वापरला गेला, याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून पुढील सूचना देण्यात आल्या आहेत. गाण्यात दिसणारी रोडवेज बस कोणत्या डेपोची आहे याची ओळख पटवावी.
तसेच संबंधित बसच्या ड्रायव्हर आणि कंडक्टरवर विभागीय कारवाई करावी. तसेच गाण्यात दिसणाऱ्या शाळेची ओळख पटवून व्यवस्थापनाविरुद्ध कारवाई करावी असे आदेश देण्यात आले आहेत. Badshah Song Controversy
हेही वाचा:
Pune Crime : सिंहगड डेंटल कॉलेजच्या विभागप्रमुखाची आत्महत्या! धक्कादाक कारण समोर..वाचा सविस्तर





