नवी दिल्ली – बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. शनिवारी लांबागड नाल्यात महामार्गाचा सुमारे 20 मीटरचा भाग वाहून गेला असल्याचे समोर आले. याठिकाणी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) कडून वाहनांच्या वाहतुकीसाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, नाल्यात पाणी जास्त असल्याने छोटी वाहने अजूनही अडकून आहेत.
प्रवासी वाहनांची वाहतूक, पोलीस आणि एसडीआरएफच्या जवानांच्या उपस्थितीत केली जात आहे. छिन्का येथेही डोंगरावरून ढिगारा आल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजूने वाहनांची वाहतूक सुमारे तासभर ठप्प झाली होती. रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे बद्रीनाथ महामार्ग लांबागड नाल्यात सुमारे 20 मीटर वाहून गेला.
याठिकाणी पाण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात डेब्रिज आणि खड्डे महामार्गावर आले. खाचडा नाला वाहून जात असल्याची माहिती मिळाली. त्यावरून बद्रीनाथ धाम येथून परतणाऱ्या सुमारे 500 भाविकांना धामातच थांबविण्यात आले, तर धामाकडे जाणारे सुमारे 1000 यात्रेकरू अडकल्याने पांडुकेश्वर येथे थांबले.सुमारे दहा तास भक्त विविध ठिकाणी अडकवून राहिल्याचे समोर आले.
सकाळी सात वाजता बीआरओकडून पावसाचा वेग कमी झाल्याने जेसीबीने महामार्ग खुला करण्याचे काम सुरू झाले. दगडांची विल्हेवाट अलकनंदा बाजूला करण्यात आली. त्यानंतर पाण्याचा निचरा करण्यात आला. दुपारी तीनच्या सुमारास येथून वाहनांची ये-जा सुरू झाली. खड्ड्यात छोटी वाहने अडकल्याने यात्रेकरूंना काही अंतर पायी जावे लागले. खाचडा नाल्यातही तीन वाजेपर्यंतच महामार्ग सुरळीत होऊ शकला. छिन्का येथेही दुपारी दोन वाजता ढिगारा महामार्गावर आल्याने सुमारे तासभर वाहनांची वाहतूक ठप्प झाली होती.