#PVSindhuWedding | भारताची फुलराणी ‘पी.व्ही. सिंधू’ अडकणार लग्नबंधनात; जाणून घ्या, कोण आहे तिचा जोडीदार?

हैदराबाद – दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती आणि भारतीय बॅडमिंटनची सुपरस्टार पीव्ही सिंधू (PV Sindhu) 22 डिसेंबर रोजी उदयपूरमध्ये विवाहबद्ध होणार आहे. अलीकडेच सय्यद मोदी इंटरनॅशनल खिताब जिंकणारी पीव्ही सिंधू ही पोसाइडेक्स टेक्नॉलॉजीजचे कार्यकारी (Posidex Technologies) संचालक असलेले हैदराबादस्थित व्यंकट दत्त साई (Venkata Datta Sai) यांच्याशी लग्नगाठीत अडकणार आहे.
सिंधूचे वडील पीव्ही रमण यांनी पीटीआयला सांगितले की, “दोन्ही कुटुंब एकमेकांना ओळखत होते, परंतु सर्व काही एक महिना अगोदरच ठरले होते. हीच एकमेव वेळ होती, कारण जानेवारीपासून त्यांचे वेळापत्रक खूप व्यस्त होईल.” ते पुढे म्हणाले, “म्हणून दोन्ही कुटुंबांनी 22 डिसेंबर रोजी लग्न समारंभ आयोजित करण्याचा निर्णय घेतला. पुढचा हंगाम खूप महत्त्वाचा असल्याने ती लवकरच तिचे प्रशिक्षण सुरू करेल.”
रिओ 2016 मध्ये रौप्य आणि टोकियो 2020 मध्ये कांस्यपदक जिंकून ऑलिम्पिकमध्ये सलग दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी सिंधू ही भारतातील एकमेव बॅडमिंटनपटू आहे.
Venkata Datta Sai : All about PV Sindhu’s to-be husband…
वेंकट दत्ता साई यांनी फाउंडेशन ऑफ लिबरल अँड मॅनेजमेंट एज्युकेशनमधून लिबरल आर्ट्स अँड सायन्सेसमध्ये डिप्लोमा केला आहे. त्यांनी 2018 मध्ये फ्लेम युनिव्हर्सिटीमधून अकाउंटिंग आणि फायनान्समध्ये बीबीए पदवी शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी बंगळूर येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधून डेटा सायन्स आणि मशीन लर्निंगमध्ये मास्टर्स केले. डिसेंबर2019 मध्ये Posidex मध्ये रुजू होण्यापूर्वी त्यांनी सावर ॲपल ॲसेट मॅनेजमेंटमध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती.






