सिंधूला पराभवाचा धक्का
Updated On:

माद्रीद – भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिला बीडब्ल्यूएफ जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसला.
या फेरीत सिंधूला जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत पहिल्या स्थानी असलेल्या तैपेईच्या ताई झु यिंगकडून 21-17, 21-13 असा पराभव पत्करावा लागला.
सिंगने सिंधूचे आव्हान केवळ दोन गेममध्ये संपुष्टात आणले. जपानमध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये यिंगनेच उपांत्य फेरीत सिंधूला पराभूत केले होते.





