अहमदाबाद – आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमाचा अखेरचा म्हणजेच विजेतेपदाचा सामना आज (दि.28) अहमदाबाद येथे रंगणार आहे. 31 मार्चपासून सुरू झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम लढतीत हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स व महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज हे दोन बलाढ्य संघ आमनेसामने आले आहेत. पंड्याच्या गुजरातने गेल्या वर्षीच्या पदार्पणानंतर यंदा सलग दुसऱ्या वर्षी अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. तर, धोनीचा चेन्नई संघ पाचव्या विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान, पावसामुळे टॉसला उशीर होत आहे.
🚨 Update
It’s raining 🌧️ in Ahmedabad & the TOSS has been delayed!
Stay Tuned for more updates.
Follow the match ▶️ https://t.co/IUkeFQS4Il#TATAIPL | #Final | #CSKvGT pic.twitter.com/eGuqO05EGr
— IndianPremierLeague (@IPL) May 28, 2023
अहमदाबादमध्ये अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे. जर सामना 9:35 वाजता सुरू झाला, तर पूर्ण षटके टाकली जातील. दोन्ही संघ 20-20 षटके खेळतील. तसे न झाल्यास ओव्हर कटिंग सुरू होईल. रात्री 12.06 पर्यंत पाच षटकांचा सामना झाला नाही तर सामना राखीव दिवशी पूर्ण होईल.
Scenarios for the night:
9️⃣:4️⃣0️⃣ – Full Game
1️⃣1️⃣:5️⃣6️⃣ – Five Over Game
No Game – Reserve Day Tomorrow#CSKvGT #IPL2023 🦁💛— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 28, 2023
आज सामना न झाल्यास सोमवारी (29 मे) पुन्हा सामना खेळवला जाईल. सोमवारीही पावसामुळे सामना झाला नाही, तर साखळी फेरीअखेर गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असणारा गुजरात टायटन्सचा संघ हा सामना जिंकेल आणि IPL 2023 चा विजेता ठरेल आणि हिच चेन्नई सुपर किंग्जसाठी वाईट बातमी आहे.