मंत्रिमंडळ विस्तारावरून बच्चू कडूंनी साधला निशाणा,’आम्हाला मंत्रिपद मिळणार नाही, दिलं तर…’

Bachu Kadu । यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप करतांना दिसले नाहीतर महायुतीतही सत्ताधारी मित्रपक्ष सुद्धा एकेमकांवर टीका करत होते. महायुतीतील प्रहारचे आमदार बच्चू कडू यावरून अनेकदा चर्चेत आले. महायुतीत असून सुद्धा त्यांनी अनेकदा सरकारमधील मंत्र्यांवर टीका केलेली दिसली. अशात आता लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूक होणार आहे.
विधानसभा निवडणुकीतवरून पुन्हा एकदा बच्चू कडू यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडत महायुतीवर नाराजी व्यक्त केली आहे. आमदार बच्चू कडू म्हणाले,’आम्हाला राजकारण करावे लागेल जागा लढवाव्या लागेल राजकीय पार्टीचा हा गुणधर्म असतो.या जागा संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही लढणार आहोत. पहिले आम्ही कसं लढणार काय लढणार हे ठरवू आणि आमचा अजेंडा सामान्य माणसाचा राहील.’ असेही ते म्हणाले आहे.
Bachu Kadu । मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलतांना ते म्हणाले..
‘मंत्रिमंडळ विस्तारा झाला तर मला तर देणार नाही आणि दिलं तरी मी घेणार नाही आलच वाट्याला तर आमचे राजकुमार पटेल यांना देऊ. आदिवासी आमदार आहे. आम्ही दोनच आमदार असताना मजबुतीने सोबत राहून काम केलं. राजकुमारने आमचा पक्ष मजबूत ठेवला त्यांना देऊ, फुटीचे कारण काय ते दोन दिवस वेळ द्यावा लागेलमी सगळ सांगेल.’ असं कडू यांनी म्हटलं आहे.
Bachu Kadu । विधान सभा निवडणुकीत वीस जागा लढणार…
‘लढविण्या संदर्भात उद्या आमची मुंबईला मिटींग आहे वीस ठिकाणच्या लोकांना आम्ही बोलावलेलं आहे सगळ्यांसोबत चर्चा करून विव्ह रचना आखली जाणार आहे. युतीसोबत किंवा आघाडी सोबत कसं जाता येईल किंवा व्यक्तिगत रित्या कस लढता येईल यावर आम्ही चर्चा करणार आहोत. महायुतीसोबत आहोत याचा अर्थ असा नाही की आम्ही लढू नये युतीसोबत असलो तरी आम्हाला लढणं गरजेचं आहे. आमची पार्टी आहे, आम्हाला हातपाय हलवणे गरजेचे असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितल.





