Bacchu Kadu | प्रहार नेते बच्चू कडू यांनी दिव्यांग व शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन केले होते. रायगड पायथ्याशी 21 मार्चला हे आंदोलन सुरू करण्यात आले होते. दिव्यांगांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. मात्र आज तिसऱ्या दिवशी हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. मंत्री भरत गोगावलेंच्या मध्यस्थीनंतर बच्चू कडू यांनी आंदोलन स्थगित केले आहे. सरकार दिव्यांगांसाठी सकारात्मक निर्णय घेईल, असं गोगावले म्हणाले. दिव्यांगांना रोजगार देण्याच्या आश्वासनानंतर कडूंचं अन्नत्याग स्थगित करण्यात आले आहे. याशिवाय दिव्यांगांना अंत्योदय योजनेतुन आणि रोजगार हमी योजनेतुन लाभ देण्याचा शब्द दिला असून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बच्चु कडू यांची चर्चा होणार असल्याचीही माहिती समोर आला आहे. यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी शिरा आणि लिंबू पाणी देऊन बच्चु कडू यांचे आंदेलन सोडवले. दरम्यान, रायगडच्या पायथ्याशी रखरखत्या ऊनामुळे बच्चू कडू यांना काल त्रास झाला होता. त्यांचा बीपी वाढलेला आणि शुगर लेवल खूप कमी झाली होती. भर उन्हात अन्नत्याग सुरू असल्यामुळे अधिकच त्रास होत असल्याने बच्चू कडू यांना हा त्रास झाल्याचे सांगण्यात आले होते. Bacchu Kadu | दरम्यान, दिव्यांग व शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. या अन्नत्याग आंदोलनात प्रहार पक्षाचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. Bacchu Kadu | हेही वाचा: Shirur: १० वर्षीय अपहरण केलेल्या बालिकेची मुंबईतून सुखरूप सुटका; सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने शिरूर पोलिसांनी केला तपास