नागपूर : राज्यभरात आमच्या आंदोलनाचे कौतुक करण्यापेक्षा बदनामी अधिक केली जात आहे. आम्ही मॅनेज झालो असे बोलतात, शेतकरी आंदोलन बंद करा, असे आमचे कार्यकर्ते म्हणतात. काहीजण मॅसेज करताय, त्यांनी ते केल्यापेक्षा आंदोलनात सहभागी व्हा. आज आम्हाला आनंद आहे कर्जमाफीचा मुद्दा जो संपला होता, तो बच्चू कडूमुळे आज जिवंत झाला आहे. पण आमच्यावर कमेंट, आरोप आणि टीका करण्यापेक्षा गावा गावात आंदोलन उभे करा, अशा शब्दांत खडेबोल सुनावत प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. बच्चू कडू म्हणाले, २०२०-२१ मध्ये कर्जमाफी झाली. दोन कर्जमाफी झाली ती थकीत कर्जदारांची झाली. नियमित कर्जफेड करणाऱ्यांची झाली नाही. काल जर कर्जमाफी झाली असती तर शेतकऱ्यांचे नुकसान झाले असते. सक्तीची वसुली आणि वसुली यात फरक आहे. शासन निर्णय आहे की, वसुली थांबवा. जर वसुली केली तर बच्चू कडू ठोकणार. असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. ३० जूननंतर जर कर्जमाफी नाही झाली तर भाजपला निवडणुकीत मत देऊ नका. सरकारने आज कर्जमाफी दिली असती तर, १५-२० कोटीत निपटले असते. आता ३० जून असल्याने ४५ कोटींच्या वरती आकडा जाईल. अलिबाग याठिकाणी राज्यातील सगळ्या जिल्हा बँकेच्या अध्यक्षांना १२ तारखेला बोलाविले आहे. दुसरीकडे सत्ताधाऱ्यांची बी टीम माझ्या मागे लागली आहे. माझे घर हवामहल आहे म्हणतात, या पाहायला एकदा आणि पहा. आमचे काय हाल झाले हे आम्हालाच माहीत आहेत, असेही बच्चू कडू म्हणाले. आता 8वा वेतन लागू केला, का तर बिहार निवडणूक आहे म्हणून. आम्ही २७ पासून आंदोलन सुरू केले आहे. आम्ही मरायला पाहिजे, असे काहींना वाटत होते. अनेकांवर गुन्हे दाखल झालेत. माझ्यावर अनेक गुन्हे दाखल केलेत. कोर्टाचा आदेश आला तर आम्ही जेलभरो करायला सुरुवात केली. पण आमची परिस्थिती दाखवायला मीडिया कमी पडला, अशी खंतही बच्चू कडू यांनी बोलून दाखवली.