बच्चन कुटुंबीयांचा विमानतळावरील व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले ‘ऐश्वर्या…’

Abhishek Bachchan Video| अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यात दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. अशात अभिषेक बच्चन, जया बच्चन आणि बहीण श्वेता बच्चन मंगळवारी रात्री मुंबई विमानतळावर स्पॉट झाले. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये अभिषेकने विमानतळातून बाहेर पडताना पापाराझींना हात जोडले आणि त्याच्या कारकडे निघून गेला. जया बच्चनही त्यांच्या कारकडे चालत गेल्या आणि श्वेता पापाराझींकडे बघत हसून निघून गेली. यानंतर नेटकऱ्यांनी ऐश्वर्या व आराध्या कुठे आहेत असे विचारले आहे. तर एका यूजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की, ‘ऐश्वर्या आणि आराध्याशिवाय बच्चन कुटुंब अपूर्ण आहे,’ तर एका यूजरने विचारले, ‘ऐश्वर्या त्यांच्यासोबत का नाही?’ Abhishek Bachchan Video|
View this post on Instagram
अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या अफवा
अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नात अभिषेक बच्चन कुटुंबाबरोबर आला होता, तर ऐश्वर्या राय व आराध्या वेगळ्या आल्या होत्या. तेव्हापासून या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. नुकत्याच ऐश्वर्या व आराध्या दोघाही एकट्याच न्यूयॉर्कला फिरायला गेल्या होत्या, अभिषेक बच्चन त्यांच्याबरोबर नव्हता. असं अनेकदा घडल्याने ते विभक्त होणार असल्याची चर्चा रंगली आहे. परंतु यासंदर्भात आतापर्यंत ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन किंवा बच्चन कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याने प्रतिक्रिया दिलेली नाही. Abhishek Bachchan Video|
ऐश्वर्या नेहमी मुलगी आराध्यसोबत स्पॉट होते. यामुळे अभिषेक-ऐश्वर्याच्या नात्यामध्ये काहीतरी बिघडले आहे. असा अंदाज लावला गेला. एका मीडिया रिपोर्टनुसार, अभिषेकला घटस्फोटाबद्दल विचारल्यावर त्याने मी अजून विवाहित आहे असे म्हणत लग्नाची अंगठी दाखवली होती. त्यामुळे अभिषेक-ऐश्वर्या यांच्या नात्याबाबत विविध चर्चा रंगत आहे.
हेही वाचा :
सरकारनंच सांगितलं हत्ती, पाणघोडे मारून जनतेला खायला द्या! ‘या’ देशात ना भूतो ना भविष्य अशी उपासमारी…





