प्रचार दौरा सोडून बच्चू कडूंनी अपघातग्रस्तांना केली मदत
Updated On:

अकोला : प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू हे आज अकोल्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी मूर्तिजापूर मतदारसंघात दौऱ्यावर असताना बच्चू कडू हे अपघातग्रस्त व्यक्तींच्या मदतीसाठी धावून गेल्याचे पाहायला मिळाले. बच्चू कडू यांनी तातडीनं जखमींना उपचारासाठी रुग्णालयात रवाना केलं.
अकोल्यातल्या मुर्तिजापुर आणि पिंजर रस्त्यावर हा अपघात झाला होता. यादरम्यान बच्चू कडू हे अकोल्यात मुर्तीजापुर मतदारसंघाचे प्रहारचे उमेदवार रवी राठी यांच्या प्रचारासाठी गेले होते. यावेळी बच्चू कडू प्रचार दौरा सोडून जखमींच्या मदतीसाठी धावले. जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर बच्चू कडू पुढील दौऱ्यासाठी निघून गेले.





