वॉर्सा – मानवी रक्ताची तहान असलेल्या व्हॅम्पायरबाबत सगळ्यांनाच नेहमी कुतूहल असते अनेक कथा आणि कहाण्या प्रचलित आहेत आता पोलंडमध्ये एके ठिकाणी उत्खनन चालू असताना संशोधकांना तब्बल 400 वर्षांपूर्वीचा एक सांगाडा सापडला असून तो एका बेबी व्हॅम्पायरचा सांगाडा असावा अशी शक्यता व्यक्त होत आहे ज्या प्रकारे या लहान मुलावर दफनविधी करण्यात आल्याचे दिसत आहे.
ते पाहता 400 वर्षांपूर्वी हा मुलगा व्हॅम्पायर असल्याचा संशयावरूनच त्याला अशा प्रकारे पुरण्यात आले असावे अशी शक्यता व्यक्त होत आहे पोलंडमधील पेन प्रांतामध्ये एका ठिकाणी हा सांगाडा सापडला आहे हा सांगाडा पुरताना त्याचा चेहरा खालच्या बाजूला म्हणजे जमिनीच्या दिशेने आहे तर पायामध्ये साखळदंड जखडण्यात आले आहेत परिसरातील लोकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ज्या ठिकाणी हे अवशेष सापडले तो प्रदेश गरीब लोकांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी वापरण्यात येतो म्हणजे त्या काळामध्ये ज्यांना अंत्यसंस्काराचा खर्च परवडत नसे त्यांना या ठिकाणी पुरण्यात येत असे या बेबी व्हॅम्पायरच्या पायामध्ये साखळ दंड अडकवण्यात आलेले आहेत.
ते पाहता त्या काळामध्ये लोकांना जिवंतपणे या बेबी व्हॅम्पायरची भीती वाटत असावी आणि पुरल्यानंतर सुद्धा त्याने बाहेर येऊ नये म्हणून त्याच्या पायामध्ये साखळ दंड घालण्यात आले असावेत या सांगाड्याचे लिंग शोधणे अवघड असले तरी ज्यावेळी ह्या बेबी व्हॅपायरला पुरण्यात आले तेव्हा त्याचे वय पाच ते सात असे असावे असा अंदाज मात्र बांधण्यात आला आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बेबी व्हॅम्पायरचे अवशेष जेथे सापडले तेथून थोड्याच अंतरावर 2022 मध्ये एका महिला व्हॅपायरचे सुद्धा अवशेष सापडले होते त्या महिलेच्या पायातही साखळदंड अडकवण्यात आले होते आणि तिला सुद्धा चेहरा जमिनीकडे करून पुरण्यात आले होते हा प्रदेश त्या काळामध्ये अशा प्रकारे व्हॅम्पायरवर अंत्यसंस्कार करण्यासाठी वापरण्यात येत असावा अशी शक्यता आता व्यक्त होत आहे.