योगी सरकारने मुलायम सिंह यांची सून अपर्णा यादव यांच्यावर सोपवली महिला आयोगाची मोठी जबाबदारी

लखनौ : उत्तर प्रदेश सरकारने मुलायम सिंह यादव यांची धाकटी सून अपर्णा यादव यांच्यावर राज्य महिला आयोगाची मोठी जबाबदारी सोपवली आहे. सरकारने अपर्णा यादव यांना महिला आयोगाच्या उपाध्यक्षपदी तर बबिता चौहान यांना यूपी महिला आयोगाच्या नवीन अध्यक्षपदी नियुक्त केले आहे. याशिवाय चारू चौधरी यांचीही राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार या सर्वांची नियुक्ती एक वर्षासाठी किंवा राज्य सरकारच्या पुढील आदेशापर्यंत करण्यात आली आहे. मुलायम सिंह यांची सून अपर्णा यादव यांनी जानेवारी 2022 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.
महिला आयोगाच्या सदस्यांच्या नावांची घोषणा –
याशिवाय सरकारने यूपी महिला आयोगाच्या सदस्यांची नावेही जाहीर केली आहेत. राज्य महिला आयोगाच्या सदस्य म्हणून 25 महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. 25 सदस्यांचा कार्यकाळ एक वर्षासाठी किंवा पुढील सरकार येईपर्यंत निश्चित करण्यात आला आहे.
राज्य महिला आयोगाच्या सदस्यांची यादी –
-हिमानी अग्रवाल, मेरठ
-सुनीता श्रीवास्तव, बलिया
-अंजू प्रजापती, लखनौ
-पूनम द्विवेदी, कानपूर
-अनिता गुप्ता, कानपूर
-अनुपमा सिंग लोधी, झाशी
-सुजिता कुमारी, लखीमपुरी खेरी
-मीना कुमारी, अलीगढ
-नीलम प्रभात, मिर्झापूर
-गीता बिंद, लापरी गाव, जौनपूर
-गीता विश्वकर्मा, प्रयागराज
-पुष्पा पांडे, बरेली
-डॉ.प्रियांका मौर्य, लखनौ
-मीनाक्षी भारला, मेरठ
-रितू शाही, लखनौ
-सुनीता सैनी, रामपूर
-एकता सिंग, लखनौ
-अर्चना पटेल, ललितपूर
-जनक नंदिनी, संत कबीर नगर
-प्रतिभा कुशवाह, कौशांबी
-रेणू गौर, कासगंज
-मनीषा अहलावत, मेरठ
-अवनी सिंग, बिजनौर
-सपना कश्यप, सहारनपूर
-संगीता जैन (अन्नू) बिजनौर





