बब्बर खालसा दहशतवाद्याला अटक ; रशियन पिस्तूल अन् स्फोटके जप्त, पंजाबमधून झाला होता फरार

Babbar Khalsa Terrorist Arrested । उत्तरप्रदेश एटीएस आणि पंजाब पोलिसांनी आज सकाळी मोठी कारवाई केली आहे. एटीएस आणि पंजाब पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बब्बर खालसा इंटरनॅशनल (बीकेआय) आणि आयएसआय मॉड्यूलचा सक्रिय दहशतवादी लाजर मसीह यालाअटक केली आहे. त्याला उत्तरप्रदेशच्या कौशांबी जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. हा दहशतवादी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये न्यायालयीन कोठडीत असताना पंजाबमधून पळून गेला होता.
बब्बर खालसा दहशतवादी लाजर मसीह मुलगा कुलविंदर हा पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील रहिवासी आहे. आज पहाटे ३.२० वाजता कौशांबीच्या कोखराज भागातून त्याला उत्तरप्रदेश एसटीएफ आणि पंजाब पोलिसांनी पकडले. या दहशतवाद्याकडून अनेक आधुनिक शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.
दहशतवाद्याकडून काय जप्त करण्यात आले? Babbar Khalsa Terrorist Arrested ।
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेश एसटीएफने दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि बेकायदेशीर शस्त्रे जप्त केली आहेत. लाजर मसीहकडून तीन सक्रिय ग्रेनेड, २ सक्रिय डेटोनेटर्स, एक रशियन पिस्तूल (नोरिंको एम-५४ टोकरेव्ह), १३ जिवंत काडतुसे, पांढऱ्या रंगाची स्फोटके आणि गाझियाबादचा पत्ता असलेले आधार कार्ड आणि सिम कार्ड नसलेला मोबाईल जप्त करण्यात आला.
लाजरस मसिह आयएसआयच्या संपर्कात होता Babbar Khalsa Terrorist Arrested ।
दहशतवादी लाजर मसीह हा बब्बर खालसाच्या जर्मन मॉड्यूलमधील दहशतवादी स्वर्ण सिंग उर्फ जीवन फौजीसाठी काम करत होता आणि तो पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या आयएसआयच्या एजंट्सच्या संपर्कात होता, असेही उघड झाले आहे. यूपी एटीएस आणि पंजाब पोलिसांच्या या संयुक्त कारवाईने आयएसआयचे नापाक हेतू उध्वस्त केले आहेत.
हेही वाचा
पाकिस्तानात दहशतवादी हल्ला; तीन मुलांसह १२ जणांचा मृत्यू





