Baba Vanga Predictions : बाबा वेंगांचं 2026 बद्दलचं भाकीत आलं समोर; केली जगाला हादरवणारी ‘ही’ भविष्यवाणी

बाबा वेंगा या एक महान भविष्यवेत्त्या होत्या, त्यांचा जन्म बल्गेरियामध्ये 1911 साली झाला, तर त्यांचा मृत्यू 1996 साली झाला. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक भविष्यवाण्या केल्या, ज्यापैकी अनेक खऱ्या ठरल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जातो. विशेष म्हणजे, त्यांनी आपल्या मृत्यूपूर्वी तब्बल 5079 सालापर्यंतच्या भविष्यवाण्या करून ठेवल्या. या भाकितांमध्ये नैसर्गिक आपत्ती, राजकीय उलथापालथ, तिसरे महायुद्ध आणि तंत्रज्ञानातील क्रांती यांचा समावेश आहे. 2025 च्या भाकितांनी जगाचे लक्ष वेधले असताना, आता 2026 साठी त्यांनी काय सांगितले आहे, याबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. चला, बाबा वेंगा यांच्या 2026 च्या भविष्यवाण्यांचा सविस्तर आढावा घेऊया…
2026: जागतिक बदलांचा काळ
बाबा वेंगा यांच्या 2026 साठीच्या भविष्यवाण्यांमध्ये आशा आणि भीती यांचे मिश्रण आहे. त्यांच्या मते, 2026 ते 2028 या काळात जागतिक बदलांचा वेग वाढेल
जागतिक उपासमारीचा अंत :
2026 ते 2028 दरम्यान जागतिक उपासमारीची समस्या पूर्णपणे मिटेल. तंत्रज्ञान आणि शेतीतील प्रगतीमुळे अन्नसुरक्षा सुनिश्चित होईल, असे त्यांनी सांगितले आहे.
चीनची आघाडी:
2026 मध्ये चीन आर्थिक आणि लष्करी शक्तीच्या बाबतीत अमेरिकेला मागे टाकून जागतिक महासत्ता बनेल. हे भाकीत आशिया-प्रशांत क्षेत्रातील वाढत्या तणावाशी जोडले जाते.
विज्ञान आणि तंत्रज्ञानातील क्रांती :
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), टेलिपॅथी आणि मानवी मेंदूच्या रहस्यांचा उलगडा यासारखे नवीन शोध लागतील. मात्र, AI च्या वाढत्या प्रभावामुळे बेरोजगारी आणि नैतिक प्रश्न उद्भवतील.
तिसरे महायुद्ध :
सर्वात धक्कादायक भाकीत म्हणजे तिसऱ्या महायुद्धाची शक्यता. प्रमुख शक्तींमधील तणाव वाढून 2026 मध्ये जागतिक युद्धाला सुरुवात होऊ शकते, असे त्यांनी सांगितले आहे. हे भाकीत सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीशी जोडले जाते.
एलियन संपर्क आणि नैसर्गिक आपत्ती :
नोव्हेंबर 2026 मध्ये एलियन्सशी पहिला संपर्क होईल, ज्यामध्ये एक मोठे अंतराळयान पृथ्वीवर येईल. त्याचवेळी, भूकंप, ज्वालामुखी उद्रेक आणि हवामान बदलामुळे पृथ्वीच्या मोठ्या भागाचा विनाश होईल.
बाबा वेगां यांनी याअगोदरदेखील अनेक भाकिते वर्तवली आहेत. ती खरी ठरली आहेत. त्या भाकितांबद्दल थोडक्यात जाणून घेऊया…
2025: जगाच्या अंताची सुरुवात
बाबा वेंगा यांनी 2025 ला ‘जगाच्या अंताची सुरुवात’ म्हणून संबोधले होते. त्यांच्या भाकितानुसार, या वर्षी मोठ्या प्रमाणात भूकंप, महापूर आणि युद्धांचा सामना जगाला करावा लागेल. समर्थकांच्या मते, ही भविष्यवाणी खरी ठरली आहे:
नैसर्गिक आपत्ती :
2025 मध्ये अनेक देशांमध्ये विनाशकारी भूकंप आणि महापूर आले. विशेषत: म्यानमारमधील 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप, युरोपातील उष्णतेच्या लाटा, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियातील जंगलातील आगी आणि भारतातील मान्सूनमुळे आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली.
युद्ध आणि संघर्ष :
बाबा वेंगा यांनी युरोपातील दोन देशांमधील संघर्ष आणि मध्य पूर्वेतील युद्धाची भविष्यवाणी केली होती. इस्रायल आणि इराणमधील भीषण युद्ध, युक्रेन-रशिया संघर्षाची तीव्रता आणि भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव यामुळे त्यांचे भाकीत खरे ठरल्याचा दावा केला जात आहे.
इतर भाकितं :
हिटलरचा मृत्यू, 9/11 चा हल्ला, जपानमधील त्सुनामी आणि ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांचा मृत्यू यांसारख्या घटनांचा समावेश त्यांच्या यशस्वी भविष्यवाण्यांमध्ये केला जातो. 2025 साठी त्यांनी एलियन संपर्क आणि टेलिपॅथीच्या विकासाबाबतही भाकीत केले होते, ज्यामुळे NASA च्या 3I/ATLAS वस्तूच्या उल्लेखाला काहींनी जोडले आहे.
भविष्यवाण्यांचा वाद
बाबा वेंगा यांच्या भाकितांबाबत नेहमीच वाद राहिला आहे. समर्थकांचा दावा आहे की त्यांची 85% भाकिते खरी ठरली, तर टीकाकार यांना संयोग किंवा अस्पष्ट व्याख्या मानतात. तरीही, या भविष्यवाण्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात आणि लोकांमध्ये भीती आणि उत्सुकता निर्माण करतात.

