अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार
Updated On:

मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईत अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्धिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. झिशान सिद्दिकी यांच्या ऑफिसच्या बाहेर हा गोळीबार करण्यात आला.
मुंबईतील वांद्र पूर्व परिसरातील खेरनगर येथील राम मंदिर परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तीन जणांकडून हा गोळीबार करण्यात आला आहे. त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.





