Baba Siddique : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट ! पोलिसांनी बळजबरीने जबाब घेतला आरोपींचा कोर्टात घुमजाव

मुंबई : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट समोर आला आहे. मुख्य शुटरसह 8 ते 9 आरोपींनी घुमजाव केले आहे. पोलिसांनी नोंदवलेलला जबाब रद्द करावा, अशी मागणी या आरोपींनी एका अर्जाद्वारे कोर्टात केली. पोलिसांनी जबरदस्तीने आपला जबाब नोंदवल्याचे या आरोपींनी अर्जात म्हटले आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आतापर्यंत 26 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर 3 आरोपींना पकडण्यात अद्यापही यश आले नाही. आमची पथके आरोपींचा शोधा घेत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाची आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. या सुनावणी दरम्यान प्रमुख शुटर शिवकुमार गौतम याने पोलिसांनी आपला जबाब बळजबरीने नोंदवला, असा आरोपी केला. तसेच हा जबाब मागे घेण्यात यावा, अशी विनंती एका अर्जाद्वारे कोर्टाला केली. शिवकुमार गौतम याच्या या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित होत असून पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे समोर आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईतील वांद्रे पूर्व भागात 12 ऑक्टोबर 2024 रोजी तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर ही घटना घडली होती. या प्रकरणात बिश्नोई गँगने हत्येची जबाबदारी घेतली होती. या हत्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 26 आरोपींना अटक केली आहे. तर 3 आरोपी अद्याप फरार आहेत.





