Ashram 4 : बाबा निरालाचा नवा खेळ! ‘आश्रम 4 ’च्या शूटिंगला सुरुवात
Ashram 4 : आश्रम ४' ची घोषणा करताना सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम पोस्टमध्ये एक फोटो शेअर करण्यात आला आहे.

Ashram 4 : आश्रम या लोकप्रिय वेबसिरीजच्या तिसऱ्या सीझनला यश मिळाल्यानंतर दिग्दर्शक प्रकाश झाँ यांनी चौथ्या सीझनची घोषणा केली होती. आता या सीझन संदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.
या वेबसिरीजचे दिग्दर्शक आणि निर्माते प्रकाश झाँ यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चौथ्या सीझनच्या चित्रीकरणाला सुरुवात झाल्याची माहिती दिली आहे.
पोस्टमध्ये काय आहे?
‘आश्रम ४’ ची घोषणा करताना सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम पोस्टमध्ये एक फोटो शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये एक मूव्ही क्लिपबोर्ड दिसत असून, त्यावर ‘एक बदनाम आश्रम’ असे लिहिलेले आहे. हा फोटो शेअर करताना प्रकाश झाँ यांच्या प्रोडक्शन हाऊसने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “आणखी एक सुरुवात. आश्रमाच्या एका नवीन अध्यायात आपले स्वागत आहे. आश्रम ४ चे चित्रीकरण सुरू आहे.”
View this post on Instagram
‘आश्रम’ (सीझन १) २०२० मध्ये, ‘आश्रम चॅप्टर २’ (सीझन २) २०२० मध्ये आणि ‘आश्रम ३’ (सीझन ३) २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या तिन्ही सीझन्सला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला. आता चौथ्या सीझनच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली असून, हा सीझन कधीपर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येणार याबाबत माहिती समोर आलेली नाही.
नेमकी कथा काय आहे?
‘आश्रम’ ही एक लोकप्रिय हिंदी क्राईम-ड्रामा वेबसिरीज आहे. याची कथा धार्मिक बुरखा घेऊन लोकांना अंद्धश्रद्धेच्या जाळ्यात ओढणाऱ्या ढोंगीबाबाची आहे. यात दाखवण्यात आलेल्या घटनांमुळे ही सिरीज खिळवून ठेवणारा अनुभव देते. ‘आश्रम’मध्ये बॉबी देओल, अदिती पोहनकर आणि चंदन रॉय सन्याल मुख्य भूमिकेत आहेत. तसेच तुषार पांडे, दर्शन कुमार, अनुपप्रिया गोएंका, त्रिधा चौधरी आणि विक्रम कोचर या कलाकारांच्या भूमिका देखील महत्वाच्या आहेत.





