Bharat Gogawale | शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री भरत गोगावले यांच्यावर ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी अघोरी पूजा केल्याचा आरोप केला होता. यानंतर आता महायुतीतील सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी गोगावलेंचा मांत्रिकासोबतचा आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. भरत गोगावलेंचा व्हिडीओ पोस्ट करत सूरज चव्हाण यांनी भरतशेठ आणि अघोरी विद्या म्हणजेच पालकमंत्री का? असा सवाल उपस्थित केला आहे. या व्हिडिओमध्ये एक अघोरी बाबा मंत्रोच्चार करताना दिसत आहे, तर भरत गोगावले पूजेमध्ये सहभागी झालेले दिसत आहेत. बाबा भरतशेठ + आघोरी विद्या = पालकमंत्री ?? असं कॅप्शन सूरज चव्हाण यांनी या व्हिडीओला दिलं आहे. रायगडचे पालकमंत्रीपद मिळविण्यासाठी गोगावले यांनी अघोरी पूजा केल्याचा आरोप सूरज चव्हाण यांनी केला आहे. Bharat Gogawale | मागील काही दिवसांपासून रायगडच्या पालकमंत्री पदावरून भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यात वाद सुरू आहे. यातचसूरज चव्हाण यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमुळे चर्चांना उधाण आले आहे. Bharat Gogawale | या आधी वसंत मोरेंनीही भरत गोगावलेंवर या स्वरुपाचे आरोप केले आहेत. भरत गोगावलेंनी निवडणुकीच्या वेळी त्यांच्या घरी अघोरी पूजा केल्याचा आरोप वसंत मोरेंनी केला. गोगावलेंचे पूजेचे व्हिडीओही त्यांनी शेअर केले आहेत. तुमचा तुमच्या कामावर विश्वास नाही का? मग अशा पूजांचा आधार का घेतला? असा सवालही वसंत मोरे यांनी भरत गोगावलेंना केला. गोगावलेंचे प्रत्युत्तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरेंनी केलेले आरोप शिंदेंचे आमदार भरत गोगावलेंनी फेटाळले. मला अघोरी पूजा करायची असती तर पालकमंत्रिपदासाठीच केली नसती का? मी कोणतीही अघोरी पूजा केलेली नाही. माझ्या घरी अनेक साधू आणि संत येतात, हा व्हिडिओ त्याचाच आहे. तो चुकीच्या पद्धतीने सादर केला जात आहे,’ असे भरत गोगावलेंनी म्हटलं. Bharat Gogawale | हेही वाचा: मध्य पूर्वेतील तणावात सोने-चांदी चकाकले ; जाणून घ्या आज तुमच्या शहरात किती आहे किंमत ?