Baaghi 4: ‘बागी 4’ वर अक्षय कुमारची प्रतिक्रिया : “फुल ऑन अॅक्शन हंगामा, स्क्रीनवर आग लावा”

Baaghi 4: बॉलिवूडचा अॅक्शन हिरो टायगर श्रॉफ आणि संजय दत्त यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘बागी 4’ आज पासून थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली होती आणि आता रिलीज झाल्यानंतर चित्रपट चर्चेत आला आहे.
अक्षयकडून शुभेच्छा
अभिनेता अक्षय कुमार यांनी टायगर श्रॉफच्या या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर टायगर श्रॉफ आणि सुनित मोरारजी यांचा फोटो शेअर केला आणि लिहिले, “बागी 4 चा आवाज सगळीकडे ऐकू येतोय. फुल ऑन अॅक्शन हंगामा आहे. माझा मित्र साजिद नाडियाडवाला, टायगर श्रॉफ आणि सुनित मोरारजी यांना खूप शुभेच्छा. स्क्रीनवर आग लावा.”
एकत्र कामाचा अनुभव
अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांची जोडी याआधी ‘बडे मियां छोटे मियां 2’ या अॅक्शनपटात दिसली होती. ही फिल्म बॉक्स ऑफिसवर चालली नसली तरी टायगरने एका मुलाखतीत सांगितले होते की, “अक्षय सरांसोबत काम करताना खूप काही शिकलो आणि आम्ही चांगले मित्र झालो.”
दमदार अॅक्शनने भरलेली ‘बागी 4’
‘बागी 4’ हा टायगर श्रॉफच्या बागी फ्रेंचायझीची चौथी फिल्म आहे. या चित्रपटात संजय दत्त, हरनाज कौर संधू, सोनम बाजवा, श्रेयस तलपदे आणि सौरभ सचदेवा महत्त्वाच्या भूमिकेत दिसतात. चित्रपटात जबरदस्त अॅक्शन दृश्ये दिसत आहेत. सेंसार बोर्डाने याला ‘ए’ सर्टिफिकेट दिले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ए. हर्षा यांनी केले आहे.




