आयुष्मान खुरानाने ‘ड्रीम गर्ल 2’ निमित्त व्यक्त केली खास इच्छा; म्हणाला…

मुंबई – अभिनेता आयुष्मान खुराना सध्या त्याच्या ‘ड्रीम गर्ल 2’ या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटात आयुष्मान ‘पूजा’ नावाच्या पात्रावर भूमिका साकारणार आहे. यापूर्वीच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले होते. यातील त्याच्या लुकने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. नुकतेच या चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच सोहळ्यादरम्यान आयुष्मानने मनातील इच्छा व्यक्त केली. सध्या त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
‘ड्रीम गर्ल 2’च्या ट्रेलर लॉंचदरम्यान आयुष्मान म्हणाला, “मला उत्तम अभिनेत्रीसाठी पुरस्कार मिळावा अशी माझी मनापासून इच्छा आहे, ड्रीम गर्लमध्ये काम केल्यानंतर एवढी अपेक्षा मी नक्कीच करू शकतो.” त्याने ही इच्छा व्यक्त केल्यानंतर उपस्थित सारेजण हसले. तसेच त्याच्या प्रतिक्रियेला अनेकांनी दादही दिली.
View this post on Instagram
दरम्यान, ‘ड्रीम गर्ल 2’ ची निर्मिती एकता आर कपूर आणि शोभा कपूर यांनी केली आहे. तर याचे दिग्दर्शन राज शांडिल्य यांनी केले आहे. हा चित्रपट ‘ड्रीम गर्ल’चा सिक्वेल आहे. ड्रीम गर्ल 2’ हा आयुष्मान खुरानाच्या 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ड्रीम गर्ल’चा सीक्वेल आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात आयुष्मान खुरानासोबत नुसरत भरुचा महत्त्वाच्या भूमिकेत होती. तर दुसऱ्या भागात तिच्या जागी अनन्या पांडे दिसणार आहे. या चित्रपटाची कथा करमाभोवती फिरते. जो मुलीचा आवाज काढण्यात माहीर आहे. पैसे कमावण्यासाठी तो कॉल सेंटरमध्ये नोकरी करतो आणि पूजा म्हणून लोकांशी बोलतो. मात्र तिचा आवाज ऐकून अनेक लोक वेडे होतात.





