14 लाख दिव्यांनी उजळणार अयोध्या, पणत्या तयार करण्याचे काम सुरु
Updated On:

अयोध्या – अयोध्येत यंदा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर साजऱ्या होणाऱ्या दीपोत्सवात 14 लाख मातीच्या दिव्यांची रोषणाई केली जाणार आहे. येत्या दोन महिन्यात या मातीच्या पणत्या तयार करण्याचे काम शहराच्या जवळच्या गावांमध्ये कुंभार व्यावसायिकांनी आत्तापासूनच सुरू केले आहे. दिवाळीच्या एक दिवस अगोदर, उत्तर प्रदेश सरकार दीपोत्सवाचे आयोजन करते.
शरयु नदीच्या काठावर राम जन्मभूमीच्या परिसरात ही आकर्षक रोषणाई केली जाते. सन 2017 पासून राज्य सरकारने ही प्रथा सुरू केली असून गेल्या वर्षी तेथे 9 लाख पणत्या लावण्यात आल्या होत्या. या पणत्यांमुळे स्थानिक कुंभारांना चांगला व्यवसाय मिळतो तसेच हा दीपोत्सव पाहण्यासाठी आता पर्यटकही गर्दी करू लागले आहेत त्यामुळे त्यांच्यापासूनही येथील व्यावसायिकांना चांगले उत्पन्न मिळू लागले आहे.





