काबूल – अल कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आयमन अल जवाहिरी याचा नैसर्गिक कारणामुळे अफगाणीस्तानात महिन्यापुर्वी मृत्यू झाला, असे वृत्त अरब न्यूजने दिले आहे. हे वृत्त खरे असल्यास अल कायदाला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
जवाहिरी हा 1988मध्ये पाकिस्तानात उभारलेल्या या संघटनेचा सहसंस्थापक होता. त्याची जागा घेऊ शकणारे दोन ज्येष्ठ म्होरके अलिकडेच मारले गेले आहे. त्यामुळे या संघटनेपुढे नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्यावर्षी हाज्मा बीन लादेनचा अमेरिकेच्या दहशतवाद विरोधी पथकाने गेल्यावर्षी केलेल्या कारवाईत खात्मा केला होता. तर ऑगस्ट महिन्यात संघटनेचा दुसऱ्या क्रमांकाचा म्होरक्या अब्दुल्ला अहमद अब्दुल्ला उर्फ अबु महंमद अल मासरी याची इस्राईलने केलेल्या कारवाईत इराणमध्ये हत्या करण्यात आली होती.
इजिप्तचा नागरिक असणाऱ्या 69 वर्षीय जवाहिरी दोन महिन्यापुर्वी 9/11 च्या हल्ल्याच्या स्मृतीदिनी दोन महिन्यांपुर्वी शेवटचा समाज माध्यमांवर दिसला होता. अल कायदाने 11 सप्टेंबर 2001 ला अमेरिकेत चार सलग दहशतवादी हल्ले घडवले होते.
आपल्या नेत्याच्या मृत्यूची बातमी वेळेत जाहीर करायची नाही ही अल कायदाची कार्यपध्दतीच आहे, असे सांगत जिहादी मिडिया देखरेख ठेवणाऱ्या यंत्रणेच्या संचालक रिता कात्झ यांनी जवाहरी यांच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला नाही. सैफ अल अदेल याला अल कायदाचा प्रमुख म्हणून शपथ घेण्याच्या व्हिडिओकडे अनेक तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.
तो इजिप्तच्या सैन्यात कर्नल होता. त्याने 1980च्या दशकात जिहादी चळवळीत स्वत:ला झोकून दिले. मात्र लादेनच्या काळात अल कायदाची असणारी भीती कायम राखण्याचे आव्हान त्याच्या पुढे असेल, असेही काही तज्ज्ञांनी सांगितले.