नवी दिल्ली – बीसीसीआयचे सचिव जय शहा यांची अचानक आशिया क्रिकेट परिषदेच्या (एसीसी) अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे, अशी माहिती बीसीसीआयचे खजिनदार अरुण धूमल यांनी दिली आहे.
जय शहा आशिया क्रिकेट परिषदेचा कारभार नजमुल हसन पापोन यांच्याकडून घेतील. आशिया क्रिकेट परिषदेची स्थापना 1983 साली झाली होती. या परिषदेचा हेतू आशिया खंडात क्रिकेटला प्रोत्सहान देण्याचा आहे. या परिषदे सध्या 25 सदस्य आहेत.
जय शहा 2019 सालापासून बीसीसीआयचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली सध्या रुग्णालयात असल्याने शहा यांच्याकडे बीसीसीआयचा सर्व कारभार आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारी कसोटी मालिका त्याच बरोबर देशांतर्गत होणाऱ्या स्पर्धा याचे नियोजनासाठी ते काम करत आहेत.