विष्णू मंचू यांच्या कन्नप्पा या चित्रपटाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. अखेर या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत नवखा कलाकार असला तरी चित्रपट इंडस्ट्रीमधील तीन मोठे कलाकार या चित्रपटात स्क्रीन शेअऱ करताना दिसणार आहे. ज्यामध्ये दक्षिणात्य अभिनेता प्रभास, बॅालीवूडचा खिलाडीकुमार अक्षय आणि दक्षिणात्य चित्रपट इंडस्ट्रीमधील स्टार कलाकार मोहनलाल हे या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. यामुळे या तीन बड्या स्टार्सची टीझरमधील झलक पाहून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. कन्नप्पा हा एक बिग बजेट ऐतिहासिक ड्रामा चित्रपट आहे. गेल्या काही वर्षांत चित्रपटांमध्ये कॅमिओची फॅशन झाली आहे. प्रत्येक चित्रपटात कोणत्या ना कोणत्या स्टारचा कॅमिओ असतो. त्यामुळे या चित्रपटात अक्षय, मोहनलाल आणि प्रभास यांच्या खास भूमिका आहेत. अक्षय भगवान शिवाच्या भूमिकेत दिसणार आहे. काजल अग्रवाल पार्वतीची भूमिका साकारत आहे. तर किराट नावाची व्यक्तिरेखा मोहनलाल हे साकारत आहेत. ज्याला वन-नायक असेही म्हणतात. टीझरच्या शेवटी प्रभासही काही सेकंदांसाठी दिसतो. या चित्रपटात तो रुद्रच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रभास पहिल्यांदाच ऐतिहासिक भूमिका साकारणार आहे. त्याच्या या चित्रपटातील लूकची बरीच चर्चा होत आहे. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगु, मल्याळम आणि तमिळ या चारही भाषांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचे झाल्यास तामिळ आणि तेलगू लोककथांचे मिश्रण ‘कन्नप्पा’मध्ये पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रर्दर्शित करण्यात येणार आहे. अक्षय, प्रभास आणि मोहनलाल यांच्या आगामी प्रोजेक्टबदल्ल बोलायचे झाल्यास या तिघांसाठीही हे वर्ष अत्यंत व्यस्त असणार आहे. प्रभास ‘द राजा साब’, ‘स्पिरिट’, ‘फौजी’ आणि ‘कल्की पार्ट 2’ मध्ये व्यस्त असणार आहे. अक्षय कुमारकडे ‘केसरी 2’, ‘भूत बांगला’, ‘हेरा फेरी 3’, ‘हाऊसफुल 5’, ‘वेलकम टू द जंगल’ आणि ‘भागम भाग 2’ येत आहेत आणि मोहनलालने अलीकडेच ‘दृश्यम 3’ ची घोषणा केली आहे.