आ. शिरोळेंकडून नदी परिसराची पाहणी
औंध :  मुळा नदीच्या स्वच्छतेसाठी नागरिक व स्वयंसेवी संस्था यांच्याकडून केल्या जाणाऱ्या कामाची आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी नुकतीच पाहणी केली. जीवित नदी सदस्य व सचिन वाडेकर यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नदीपात्रात सोडले जाणारे घाण पाणी, पात्राशेजारी टाकला जाणारा कचरा याविषयीची तक्रार नागरिकांनी आमदार शिरोळे यांच्याकडे केली. नदीचे गरज नसताना सौंदर्यीकरण करण्यापेक्षा तिचे नैसर्गिक रूप टिकले पाहिजे यावर सर्वांनी यावेळी भर दिला.

याप्रसंगी शिरोळे यांच्यासह जीवित नदीच्या शैलजा देशपांडे, महाबळेश्वर देशपांडे, माजी नगरसेवक आनंद छाजेड इत्यादींनी नदीची पाहणी केली. नदी प्रदूषण रोखण्यासाठी जनजागृती उपाययोजना करून यापुढे नदी स्वच्छतेसाठी सर्वांनी प्रत्यक्ष नदीपात्रात काम करण्याची योजना आखण्यासंदर्भात चर्चा यावेळी करण्यात आली. औंध मंदिरात प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या निर्माल्यापासून कंपोस्ट खतनिर्मिती उपक्रमाविषयी माहिती देण्यात आली. तसेच हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राज्यभरात राबवण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे शिरोळे यांनी सांगितले. यावेळी स्थानिक नागरिक व जीवित नदीच्या वतीने मुळा नदी पात्राची स्वच्छता करण्यात आली. या प्रसंगी रोहन रानवडे, राजेंद्र वैराट, अजय पोलकमवार, विकास रानवडे, तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.