Pimpri : महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात एड्सबाबत जनजागृती
Updated On:

पिंपरी : पिंपरी वाघेरे येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात वायसीएम रुग्णालय आयसीटीसी विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना एड्सबाबत जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना एचआयव्ही आणि एड्स या आजाराचे उगम, चाचणी, निदान, उपचार याची सविस्तर माहिती देण्यात आली.
त्याचबरोबर विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना एचआयव्ही एड्स कार्यक्रमाची रूपरेषा व आयसीटीसी विभागाचे कामकाज याबाबत लॅब टेक्निशियन संदीप कुयटे, समुपदेशक शुभांगी पाटील व राजश्री नरळे यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी महात्मा फुले महाविद्यालय यांचे प्राचार्य पांडुरंग भोसले, एनएसएसचे प्रमुख संदीप ननावरे यांचे सहकार्य लाभले.





