मंचर (पुणे)-अवसरी खुर्द येथे करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने सोमवार दि. 7 ते 11 सप्टेंबरपर्यंत गावबंद ठेवण्यात आले आहे. अशी माहिती ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आली.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी, पारगाव, लोणी, धामणीसह सर्वच गावामध्ये करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. अवसरी खुर्द गावात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 40पेक्षा जास्त झाल्याने व्यापारी व ग्रामस्थांनी एकत्र बैठक घेऊन गावातील सर्व किराणा, हॉटेल व इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी चालू झाली आहे. अवसरी बुद्रुक गावातील सर्व व्यवहार दररोज सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत चालू राहतील. मेडिकल दुकाने व दवाखाने सुरळीत चालू राहतील. अशी माहिती उपसरपंच सचिन हिंगे यांनी दिली.