पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने मंगळवारी (दि. 25) रावेत-रमाबाईनगर येथे कारवाई करून 70 झोपड्या हटविल्या. सकाळी कारवाई सुरू झाल्यानंतर महिलांनी विरोध केला. मात्र, पोलिस बंदोबस्तात कारवाई पूर्ण करण्यात आली.
प्राधिकरणाच्या संपादित जागेवर रमाईनगर येथे नव्याने पत्राशेड टाकून नागरिकांनी गेल्या वर्षभरात झोपड्या उभारल्या होत्या. प्राधिकरण प्रशासनाकडून संबंधितांना झोपड्या काढण्याबाबत वेळोवेळी सांगण्यात आले होते. तसेच सोमवारी (दि. 24) याबाबत पूर्वकल्पना देखील दिली होती. आज सकाळी 11 वाजता कारवाई सुरू झाल्यानंतर स्थानिक महिलांनी या कारवाईला विरोध केला. मात्र, पोलिस बंदोबस्तामध्ये कारवाई सुरूच ठेवण्यात आली. ही कारवाई सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरु होती.