#AUSvNZ : ऑस्ट्रेलियाचे मालिकेत निर्भेळ यश

सिडनी : ऑस्ट्रोलियाने सोमवारी न्यूझीलंडचा तिस-या कसोटी क्रिकेट सामन्यात चौथ्याच दिवशी २७९ धावांनी पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादित केले. याआधीच्या सामन्यात आॅस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर पर्थ कसोटीत २९६ तर मेलबर्न कसोटीत २४७ धावांनी विजय मिळवला होता.
Matt Henry will not bat due to his thumb injury, which means Australia have won by 279 runs!
What a performance from the hosts – they take the Test series 3-0 👏#AUSvNZ pic.twitter.com/Q3Hz01dMU8
— ICC (@ICC) January 6, 2020
तिस-या सामन्यातील पहिल्या डावात २१५ आणि दुस-या डावात ५९ धावा करणारा मार्नस लबुशेन सामन्याचा मानकरी ठरला तर मालिकेत सर्वाधिक ५४९ धावा केल्यानं मालिकावीराचा बहुमानही त्यालाच मिळाला.
Player of the Match and Player of the Series is Marnus Labuschagne
He 549 runs in the series. #AUSvNZ pic.twitter.com/wYEB9C105N
— cricket.com.au (@cricketcomau) January 6, 2020
ऑस्ट्रोलियाने पहिल्या डावात सर्वबाद ४५४ धावा केल्या होत्या. त्यानंतर रविवारी तिस-या दिवशी आॅस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पहिला डाव २५६ धावांत संपवून १९८ धावांची भक्कम आघाडी घेतली.
त्यानंतर ऑस्ट्रोलियाने दुस-या डावात डेव्हिड वाॅर्नरच्या नाबाद १११ तर मार्नस लबुशेनच्या ५९ आणि जो बर्न्सच्या ४० धावांच्या खेळीच्या जोरावर ५२ षटकांत २ बाद २१७ धावसंख्येवर डाव घोषित न्यूझीलंडसमोर विजयासाठी ४१६ धावांचे आव्हान उभं केलं होतं.
Australia declare on 217/2, but they have been penalised five runs for running in the danger area of the pitch, which have been added to New Zealand's first-innings total.
🎯 for New Zealand: 416. #AUSvNZ pic.twitter.com/CJPxyX6tKK
— ICC (@ICC) January 6, 2020
प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा दुसरा डाव १३६ धावांवरच आटोपला आणि त्यांना तिसरा सामना गमवावा लागला. न्यूझीलंडचा मॅट हेनरी दुखापतीमुळे दुस-या डावात फलंदाजी करू शकला नाही. आॅस्ट्रेलियाकडून दुस-या डावात नाॅथन लाॅयनने ५ तर मिशेल स्टार्कने ३ गडी बाद करत संघाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिलं.





