सिडनी : भारताचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत खेळण्यासाठी सज्ज असून सध्या तो सिडनी येथे विलगीकरणात आहे. परंतु करोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे सिडनीत लागू करण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे एकीकडे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने डेव्हिड वॉर्नर आणि सीन अबॉटला सिडनीहून मेलबर्नला बोलावून घेतले असताना रोहितला मात्र अद्याप तेथेच राहावे लागत आहे.
7 जानेवारीपासून सिडनीत तिसरी कसोटी खेळली जाणार असून सध्या रोहित राहात असलेल्या हॉटेलमध्येच त्याच्यासाठी सरावाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. संततधार पावसामुळे ऍडलेड येथे होणारे भारताचे सराव सत्र रद्द करण्यात आले.