ब्रिस्बेन – ऑस्ट्रेलियाने घरच्या मैदानावर होत असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या ( AUS vs SA ) कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा दोन दिवसांच्या आतच 6 गडी राखून पराभव केला. पाच दिवसांच्या या कसोटीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात दीडशे तर दुसऱ्या डावात शतकी धावांच्या आतच बाद करत तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
Ramiz Raja | भारताला धमकावणाऱ्या रमीझ राजा यांना घरचाच आहेर; PCB अध्यक्षपदावरून डच्चू मिळणार
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकत दक्षिण आफ्रिकेला पहिल्यांदा फलंदाजी दिली. ऑस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्क, नाथन लियॉन यांनी प्रत्येकी 3 तर, पॅट कमिन्स व स्कॉट बोलॅंड यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. दक्षिण आफ्रिकेकडून केल वेरेने याने सर्वाधिक 64 धावांची खेळी केली. तर, टेम्बा बवुमाने 38 धावा केल्या. त्यांचा पहिला डाव 48.2 षटकांत 152 धावांवर संपला.
ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात 50.3 षटकांत सर्वबाद 218 धावा केल्या व 66 धावांची निसटती आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाकडून प्रमुख फलंदाज अपयशी ठरत असताना ट्रॅव्हिस हेडने 92 धावांची खेळी करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्याला साथ देताना स्टिव्हन स्मिथने 36 तर ऍलेक्स कॅरीने 22 धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने 4, मार्को जेन्सनने 3 गडी बाद केले. अनरीच नोर्जेने 2 बळी मिळवले.
Ramiz Raja | भारताला धमकावणाऱ्या रमीझ राजा यांना घरचाच आहेर; PCB अध्यक्षपदावरून डच्चू मिळणार
66 धावांच्या पिछावरून दक्षिण आफ्रिकेने आपला दुसरा डाव सुरू केला. याही डावात त्यांच्या प्रमुख फलंदाजांना पुन्हा एकदा अपयश आले व त्यांचा डाव अवघ्या 99 धावांवर संपला. त्यांच्या खेया झोंडोने 36 तर, टेम्बा बवुमाने 29 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार व वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने 5 गडी बाद केले. स्कॉट बोलॅंड व मिशेल स्टार्क यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी अवघ्या 33 धावांचे आव्हान निर्माण झाले होते.
Our Men’s Cricket Team has defeated South Africa by 6 wickets in Brisbane. pic.twitter.com/igbCAJ991C
— Cricket Australia (@CricketAus) December 18, 2022
त्यांच्याही दुसऱ्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. नीचांकी धावांचा पाठलाग करतानाही त्यांचे चार फलंदाज बाद झाले. दक्षिण आफ्रिकेने अवांतर 19 धावांची रसद पुरवल्यामुळे यजमान ऑस्ट्रेलियाचा विजय साकार झाला. त्यांनी 7.5 षटकांत 4 बाद 35 धावा करत हा सामना जिंकला व मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या कसोटीत दोन दिवसांच्या आतच तब्बल 34 गडी बाद झाले. आता या खेळपट्टीवरूनही चांगलीच टीका व चर्चा रंगली आहे. मात्र, दोन्ही संघांच्या व्यवस्थापनांनी मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.