ICC ODI Rankings : एकदिवसीय क्रमवारीत ऑस्ट्रेलिया अव्वल तर भारतीय संघ…
Updated On:

दुबई :- आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या क्रमवारीत पाकिस्तानला मागे टाकत ऑस्ट्रेलियाने अव्वल स्थान प्राप्त केले आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून ब्लूमफॉन्टेन येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा 123 धावांनी पराभव करत ऑस्ट्रेलियाने क्रमवारीत पुन्हा अव्वलस्थान मिळवले.
या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचे आता 121 गुण झाले आहेत, तर दुसऱ्या स्थानावर घसरलेल्या पाकिस्तानचे 120 गुण आहेत. भारतीय संघ 114 गुणांसह तिसऱ्या स्थानावर कायम आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तान संघ एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत पहिल्या स्थानावर आला होता.





