Ausa Municipal Council। औसा नगरपरिषदेचे चित्र स्पष्ट झाले असून औसा याठिकाणी जल्लोष सुरू आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं बाजी मारली असून 23 जागे पैकी 17 जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा विजय झाला आहे. एक नगराध्यक्ष आणि 17 जागांवर विजय नोंदवला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा औसा नगरपरिषदेवर ताबा मिळवला असला तरी याठिकाणी 6 जागेवर भाजप विजय मिळवला आहे. तर काँग्रेसचा याठिकाणी लाजिरवाणा पराभव झाला आहे. Ausa Municipal Council। याठिकाणी काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. गेल्या वेळेस दोन जागा निवडून येणाऱ्या काँग्रेसला यावेळी मतदारांनी शून्यावर आणून सोडले आहे. दरम्यान, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार परवीन नवाबुद्दीन शेख यांचा साडेचारशे मतांनी विजय झाला आहे. Ausa Municipal Council।