Aus A vs Ind A 1st unofficial Test (Day 2):- ऑस्ट्रेलिया-अ संघाचा डाव 195 धावांवर गुंडाळल्यानंतर, साई सुदर्शन व देवदत्त पडीक्कल यांनी दमदार फलंदाजी करताना भारत अ संघाला दुसऱ्या डावात 208 धावांपर्यंत मजल मारून दिली. भारताचा पहिला डाव 107 धावांवर संपुष्टात आल्यानंतर ऑस्ट्रेलियाला केवळ 88 धावांची आघाडी मिळाली होती. दुसऱ्या डावात आता भारताने दमदार फलंदाजी करताना दुसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियावर 120 धावांची आघाडी घेतली आहे.
पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने भारताचा डाव 107 धावांवर गुंडाळला होता. मात्र ऑस्ट्रेलियाला देखील धावांसाठी झगडावे लागत होते. भारताच्या मुकेश कुमारने भेदक गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचे 6 फलंदाज तंबूत धाडल्याने ऑस्ट्रेलियाला केवळ 88 धावांचीच आघाडी मिळवता आली. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन मॅकस्वीनीने 39, कूपर कॉनोलीने 37, तर टॉड मर्फी व ब्यू वेबस्टर यांनी प्रत्येकी 33 धावांचे योगदान दिले. भारताकडून मुकेशकुमारला प्रसिद्ध कृष्णाने 2 तर नितीशकुमार रेड्डीने 1 गडी बाद करताना सुरेख साथ दिली.
दुसऱ्या डावात देखील भारताला अपेक्षित सुरुवात मिळाली नाही. ऋतुराज गायकवाड (5) व अभिमन्यू ईश्वरन (12) हे झटपट बाद झाल्याने भारताची अवस्था 2 बाद 30 अशी झाली. यावेळी साई सुदर्शन व देवदत्त पडीक्कल यांनी किल्ला लढवायला सुरुवात केली. दोघांनी 178 धावांची तिसऱ्या गड्यासाठी भागीदारी करताना भारताचा डाव सावरला. दरम्यान दोघांनी अर्धशतकी खेळी करताना अजून पडझड होणार नाही याची काळजी घेतली. दिवसअखेर साई सुदर्शन 96 तर देवदत्त पडीक्कल 80 धावांवर नाबाद राहिले.
Sai Sudharsan – 96*(185)
Devdutt Padikkal – 80*(167)Two young talents showing the skill in Australia, incredible from both players after being tough to bat through the match for both sides. 🌟 pic.twitter.com/EjRRTPxpHO
— Johns. (@CricCrazyJohns) November 1, 2024
संक्षिप्त धावफलक :
भारत अ : पहिला डाव : 47.4 षटकांत सर्व बाद 107
ऑस्ट्रेलिया अ : पहिला डाव : 62.4 षटकांत सर्वबाद 195 : नॅथन मॅकस्वीनी 39, कूपर कॉनोली 37, टॉड मर्फी 33, ब्यू वेबस्टर 33, मुकेश कुमार 6-46, प्रसिद्ध कृष्णा 3-59, नितीशकुमार रेड्डी 1-14.
भारत अ : दुसरा डाव : दुसरा दिवस अखेर 64 षटकांत 2 बाद 208 : साई सुदर्शन नाबाद 96, देवदत्त पडीक्कल नाबाद 80, अभिमन्यू ईश्वरन 12, फर्गस ओ’नील 1-33.