Orry In Sanjay leela Bhansali Movie | बॉलीवूडच्या प्रत्येक मोठ्या पार्टीत ओरहान अवतरामणी उर्फ ऑरी पाहायला मिळतो. तसे पाहिले तर त्याने अद्याप कोणत्याही चित्रपटात किंवा छोट्या पडद्यावर काम केलेले नाही. मात्र तरीही तो सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. यातच ऑरीच्या बॉलीवूड एंट्रीची माहिती समोर आली आहे. तो बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ऑरी आता भन्साळींच्या ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटाचा भाग असणार आहे. ऑरीला चित्रपटात कॅमिओसाठी कास्ट करण्यात आल्याचे म्हंटले जात आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि विकी कौशल मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात दीपिका पदुकोणही कॅमिओ करताना दिसणार असल्याचे नुकतेच समोर आले आहे. दीपिकाच्या स्क्रिनटाईम किंवा तिच्या पात्राबाबत कोणतीही उघड करण्यात आलेली नाही. बॉलिवूड सेलिब्रिटींचा खास मित्र ऑरी या सिनेमात आलियाच्या मित्राची भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे. Orry In Sanjay leela Bhansali Movie | आलिया चित्रपटात कॅबरे डान्सरची भूमिका साकारत आहे, तर रणबीर आणि विकी भारतीय लष्करातील अधिकाऱ्यांच्या भूमिकेत आहेत. ऑरी आता बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. गेल्या काही वर्षांत तो झपाट्याने प्रसिद्दीच्या झोतात आला आहे. तो जवळपास प्रत्येक मोठ्या बॉलीवूड पार्टीमध्ये दिसतो आणि अनेक बॉलीवूड स्टार्सशी त्याची मैत्री आहे. याशिवाय ऑरी गेल्या वर्षी बिग बॉस 17 मध्ये देखील दिसला होता. अलीकडेच तो बॉलिवूडचा टॉप निर्माता करण जोहरसोबत एका जाहिरातीतही दिसला होता. तो सध्या एक सोशल मिडिया स्टार असून काही रिअॅलीटी शोमध्येही दिसला आहे. यातच आता तो बॉलीवूडमध्ये काम करण्यासही सज्ज झाला आहे. Orry In Sanjay leela Bhansali Movie | हेही वाचा: कमालच झाली! अवघ्या 8 महिन्यांच्या नोकरीत तब्बल 30% पगारवाढ आणि प्रमोशन, ‘या’ कंपनीच्या कर्मचाऱ्याची पोस्ट व्हायरल