जामखेड – शहरातील फकीरवाडा येथील संदल मिरवणुकीत समजाकंटकांनी जाणीवपूर्वक औरंगजेबाची प्रतिमा असलेले फलक झळकावून व हिंदू विरोधी घोषणा देत हिंदू व मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. समाज कंटकावर कारवाई करावी करून त्यांना अटक करावी, यासाठी जामखेड तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने तहसिलदार योगेश चंद्रे व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. भाजपचे कर्जत-जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष रवींद्र सुरवसे, तालुकाध्यक्ष अजय काशिद, बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, संचालक सचिन घुमरे, ज्ञानेश्वर झेंडे, शहराध्यक्ष बिभीषण धनवडे, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष मोहन (मामा) गडदे, प्रवीण चोरडिया, संतोष गव्हाळे, अभय राळेभात, पोपट राळेभात, माजी सरपंच संजय गोपाळघरे, मोहन देवकाते उपस्थित होते. याशिवाय लहू शिंदे, मनोज कुलकर्णी, डॉ. एकनाथ मुंडे, विवेक कुलकर्णी, प्रविण बोलभट, माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, विष्णू गंभीरे, उदय पवार, उपसरपंच आप्पासाहेब ढगे आदी पदाधिकाऱ्यांसह भाजप कार्यकर्तेही उपस्थित होते. जामखेड शहरामध्ये काही मुस्लिम समाजामधील तरुणांनी मोबाईलवर औरंगजेबाचे स्टेस्टस ठेवून भावना दुखावण्याचा प्रयत्न केलेला आहे.