शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांना एक नवीन गुरु मिळाला आहे. उद्धव ठाकरेंचे नवीन आराध्य दैवत औरंगजेब झाला आहे. लवकरच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोजवळ औरंगजेबाचा फोटो मातोश्रीवर लावणार आहेत. त्या दिशेने त्यांचा कारभार सुरु आहे अशी बोचरी टीका शिवसेना नेते संजय निरुपम यांनी केली आहे. दिशा सालियान प्रकरणावर केले भाष्य सुशांत सिंग आणि दिशा सालियान या विषयावर बोलताना संजय निरुपन म्हणाले, दिशा सालियान हिच्या वडिलांनी सांगितले की त्यांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. कोणत्याही मुलीचा बाप असा खोटे बोलू शकत नाही. यामुळे सतीश सालियान यांची जी याचिका आहे ती स्वीकारली पाहिजे. कोर्टाने त्याच्या आधारावर मुंबई पोलिसांना ऑर्डर दिली पाहिजे. दिशा सालियान हिची मृत्यूचे जे एक रहस्य आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणात जे काही लोक आहेत त्यांना कोणालाही सोडू नये. या हत्या प्रकरणात आदित्य ठाकरेंचा हात आहे असे आम्हाला वाटते. या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे असे संजय निरुपम म्हणाले. अजित पवारांच्या वक्तव्यावर दिली प्रतिक्रिया अजित पवार यांनी जे म्हटले आहे ते आम्हाला दुरुस्त करायचे आहे. देशभक्त आणि भारतीय असलेल्या मुस्लिमांवर आमचे कोणतेही आरोप नाहीत. पण दंगल घडवणारा कोणता मुस्लिम शद्रोही आहे. आम्ही त्याच्यावर कारवाई करू त्यामुळे अजित पवारही त्याला वाचवू शकणार नाहीत.